सोलापूर : कधी कमी दावाने तर कधी गढूळ, कधीकधी रात्री-अपरात्री तेही अनियमित पाणीपुरवठा, घंटागाडी येत नाही, वाढलेलो झाडे, अस्वच्छता, दिवाबत्ती गुल, तुंबलेल्या ड्रेनेजलाईन, घाण, दुगंधीचे साम्राज्य, आरोग्याचा प्रश्न, ऐरणीवर आलेल्या अशा एक ना अनेक प्रश्नांची सरबत्ती करत माजी सभागृहनेते तथा भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील यांच्या ‘जनसंवाद’ कार्यक्रमामध्ये शहरातील जनतेने प्रभागासह शहरातील समस्यांचा पाढाच वाचला.
प्रभाग क्र. ३ मधील दाळगे प्लॉट, हनुमान मंदिरात सुरेश पाटील यांनी जनतेच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी जनसंवाद मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये प्रभागातील आणि शहरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन तेथूनच महापालिका आणि संबंधित अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीद्वारे माहिती देऊन त्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. यावेळी नागरिकांनी चक्क स्मार्ट सिटीची लक्तरे वेशीवर टांगली, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त करत महापालिकेच्या बेजबाबदार कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
महापालिका शाळा क्र. २ येथे घाण, कचरा, आजोरा माती टाकण्यात आली आहे. यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. घाण, झाडेझुडपे काढावे आणि साफसफाई करावी, प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी आरोग्य शिबीर घ्यावे, फवारणी, धुराळणी करावी, पाण्याचा प्रश्न निकाली काढावा, महिलांसाठी योजना राबवावी, अशी अपेक्षा काही महिलांनी व्यक्त केली.
यावेळी बिपीन पाटील, अर्चना कोकाटे, उर्मिला नागमोती, नागरबाई भोसले, ऐश्वर्या तुरेराव, कविता सौंडे, मंदाकिनी पवाडे, प्रभावती अंटव, सुजाता होटगी, राजश्री सिंदगी, संध्या काळे, नागच्या टोपे, महादेवी पिरजाबा, रेश्मा गवते, श्रीदेवी मुन्नूरेड्डी, यीपाली चव्हाण, सुरेखा जगले, कविता रुईकर, सुनीता मैंदर्गी, रूपाली कुंभार, अनिता स्वामी, ज्ञानेश्वर बच्चल, शशिकांत मुन्नूरेड्डी, आप्पू आहे, राजू पोदार, प्रताप काळे, श्रीशैल कुंभार, रतन नागेश काळे, नागेश खैरमोडे, उमाकांत बच्चल, रूपेश दुधनी, गणेश कुंभार, विराज हिरेमठ, आदित्य स्वामी, गीता जक्कापुरे, संदीप महाले, वल्लप्पा करली, रोहन नागमोती, प्रशांत कलशेट्टी, किरण मेटी, भीमा पुजारी, विजय कोळी यांच्यासह नागरिक उपस्थित होते, जनसेवेसाठी तप्तर असून, जनसंवाद यात्रेत थेट नागरिकांच्या दारात पोहोचत आहे, नागरिकांच्या अडीअडचणी समजून त्यावर मात करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सुरेश पाटील यांनी सांगितले.