33.3 C
Latur
Monday, March 10, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यात १० वर्षांत परकीय गुंतवणुकीचा विक्रम

राज्यात १० वर्षांत परकीय गुंतवणुकीचा विक्रम

मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण महाराष्ट्राचे अभिनंदन केले आहे. गेल्या दहा वर्षातील विक्रमी परकीय गुंतवणूक केवळ ९ महिन्यात महाराष्ट्रात आली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, महायुती सरकारने आपलाच २०१६-१७ या आर्थिक वर्षाचा विक्रम मोडला आहे. विशेष म्हणजे चालू आर्थिक वर्ष पूर्ण होण्यासाठी आणखी एक तिमाही बाकी आहे. त्या आधीच महाराष्ट्रामध्ये विक्रमी गुंतवणूक आली असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर आपल्या पोस्टमध्ये मुख्यमंर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि मंत्रिमंडळाच्या नेतृत्वात महाराष्ट्राची घोडदौड अशीच सुरू राहील असा विश्वास देखील व्यक्त केला आहे.

गेल्या १० वर्षांतील विक्रमी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली केवळ ९ महिन्यात! केंद्र सरकारच्या डीपीआयआयटीने परकीय गुंतवणुकीचा डिसेंबर २०२४ अखेरचा अहवाल जाहीर केला असून, गेल्या १० वर्षांतील सर्वाधिक वार्षिक परकीय गुंतवणूक ही अवघ्या ९ महिन्यात महाराष्ट्राने प्राप्त केली आहे. २०२४-२०२५ या आर्थिक वर्षातील पहिल्या ९ महिन्यात आतापर्यंत एकूण १,३९,४३४ कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक आली आहे. ही गेल्या १० वर्षांत महाराष्ट्रात कोणत्याही एका वर्षात आलेल्या परकीय गुंतवणुकीपेक्षा सर्वाधिक आहे. असे करताना महायुती सरकारने आपलाच २०१६-१७ या आर्थिक वर्षाचा विक्रम मोडला आहे.

अर्थात या आर्थिक वर्षातील एक तिमाही आणखी बाकी आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे पुन्हा एकदा मन:पूर्वक अभिनंदन! माझे सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, अजित पवार आणि मंत्रिमंडळाच्या नेतृत्त्वात आपल्या महाराष्ट्राची ही घौडदौड ही अशीच कायम राहील.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR