24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeउद्योगशेअर मार्केटमध्ये विक्रम!

शेअर मार्केटमध्ये विक्रम!

इतिहासात प्रथमच सेन्सेक्स आणि निफ्टी विक्रमी पातळीवर निफ्टीने गाठला २५५०० चा उच्चांक

मुंबई : भारतीय शेअर मार्केटमध्ये आज नवीन विक्रम झाला असून सेन्सेक्सने आणि निफ्टीने विक्रमी पातळी गाठली आहे. आज सेन्सेक्सने ८३,३५९.१७ ची विक्रमी पातळी गाठली आहे. तर निफ्टी प्रथमच २५,५०० च्या वर गेला आहे. यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात ०.५० टक्के कपात केली आहे. त्याचा परिणाम शेअर मार्केटवर झाला आहे.

यूएस फेडच्या निर्णयाचा तात्काळ परिणाम आज भारतीय बाजारावर दिसून आला आहे. सेन्सेक्स-निफ्टी विक्रमी उच्चांकावर गेला आहे. बँक निफ्टीही शेअर बाजारात नवीन शिखर गाठण्याच्या जवळ आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली आहे आणि एचडीएफसी बँकेने १७११ रुपयांच्या वर व्यापार दर्शविला आहे.

आज, बीएसई सेन्सेक्स ४१०.९५ अंकाच्या वाढीसह ८३,३५९.१७ वर सुरू झाला आणि एनएसई निफ्टी १०९.५० अंक किंवा ०.४३ टक्क्यांच्या वाढीसह २५,४८७.०५ वर सुरू झाला. बँक निफ्टी त्याच्या सार्वकालिक उच्चांकाने फक्त ४ अंकांनी मागे होता पण त्याचे शेअर्स मार्केटला मोठा उत्साह देत आहेत. काल आयटी शेअर्समध्ये घसरण झाली होती पण आज यूएस फेडरल रिझर्व्हच्या निर्णयामुळे आयटी शेअर्स प्रचंड वाढले आहेत.

सेन्सेक्स शेअर्सची स्थिती
सेन्सेक्समधील ३० समभागांपैकी 29 समभागांमध्ये वाढ होत असून केवळ एक समभाग घसरत आहे. बीएसई सेन्सेक्स शेअर्समध्ये जबरदस्त वाढ झाल्याने गुंतवणूकदार उत्साहित आहेत. फक्त बजाज फिनसर्व्हचे शेअर्स घसरत आहेत.

अमेरिकेचा शेअर मार्केटवर परिणाम
अमेरिका हा जगातली एक बलाढ्य महासत्ता असणारा देश आहे. या देशाने राबवलेल्या निर्णयाचा परिणाम भारतासह संपूर्ण जगावर पडतो. असे असताना आता अमेरिकेने व्याजदराबाबत मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेतील मध्यवर्ती बँफ फेडरवल रिझर्व्हने तब्बल चार वर्षांनंतर व्याजदरात कपात करण्याचे जाहीर केले आहे. फेडरल रिझर्व्हने व्याजदरात ०.५० टक्क्यांनी कपात केली आहे. अमेरिकेच्या या निर्णयानंतर आता भारतीय रिझर्व्ह बँक नेमका काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR