30.3 C
Latur
Monday, February 24, 2025
Homeक्रीडाविक्रमी कसोटी

विक्रमी कसोटी

केपटाऊन : टीम इंडियाने केपटाऊनमध्ये यजमान दक्षिण आफ्रिकेचा ७ विकेटने पराभव करून इतिहास रचला. न्यूलँड्स, केपटाऊन येथे टीम इंडियाचा कसोटी क्रिकेटमधील हा पहिला विजय ठरला. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराहने भारताच्या विजयाच्या शिल्पकार ठरले. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरी कसोटी अवघ्या दीड दिवसात संपली. चेंडूंच्या बाबतीत हा सर्वात लहान कसोटी सामना ठरला.

अवघ्या 642 चेंडूत सामना निकाली निघाला. याशिवाय या सामन्यात आणखीही अनेक विक्रम झाले. तसेच जागतिक कसोटी क्रमवारीत टीम इंडिया प्रथम स्थानावर पोहोचली आहे. दुसऱ्या कसोटीतील मोठा विजय टीम इंडियाच्या पथ्यावर पडला आहे.

सर्वात कमी चेंडूंत कसोटी निकाल

642 चेंडू – दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत, केपटाऊन, 2024*
656 चेंडू – ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, मेलबर्न, 1932
672 चेंडू – वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड, ब्रिजटाऊन, 1935
788 चेंडू – इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मँचेस्टर, 1888
792 चेंडू – इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, लॉर्ड्स, 1888.

भारताचा दक्षिण आफ्रिकेतील पाचवा कसोटी विजय, केपटाऊनमध्ये पहिला
या सामन्याद्वारे भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेतील पाचवी कसोटी जिंकली. केपटाऊनमध्ये भारताचा हा पहिलाच कसोटी विजय होता. केपटाऊनमध्ये कसोटी सामना जिंकणारा टीम इंडिया पहिला आशियाई संघ ठरला आहे.

दक्षिण आफ्रिकेत भारताचा कसोटी विजय…
123 धावांनी – जोहान्सबर्ग, 2006
87 धावांनी – डर्बन, 2010
63 धावांनी – जोहान्सबर्ग, 2018
113 धावांनी – सेंच्युरियन, 2021
7 विकेट्स – केपटाऊन, 2024*
सेना (साऊथ आफ्रिका, न्यूझीलंड, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया) राष्ट्रांमध्ये भारताचा सर्वात मोठा विजय (विकेट्स)

10 विकेट्सने- न्यूझीलंडविरुद्ध, हॅमिल्टन, 2009
8 विकेट्सने- न्यूझीलंडविरुद्ध, वेलिंग्टन, 1968
8 विकेट्सने – न्यूझीलंड विरुद्ध, ऑकलंड, 1976
8 विकेट्सने – ऑस्ट्रेलिया वि मेलबर्न, 2020
7 विकेट्सने- इंग्लंडविरुद्ध, नॉटिंगहॅम, 2007
7 विकेट्सने- दक्षिण आफ्रिकेविरुद्ध, केपटाऊन, 2024*

भारताविरुद्ध दोन्ही डावातील निचांकी धावसंख्या (दोन्ही डावात सर्वबाद)
193 धावा – इंग्लंड (अहमदाबाद, 2021)
212 धावा – अफगाणिस्तान (बंगळूर, 2018)
229 धावा – न्यूझीलंड (मुंबई हर, 2021)
230 धावा – इंग्लंड (लीड्स, 1986)
231 धावा – दक्षिण आफ्रिका (केपटाऊन, 2024)*

वेगवान गोलंदाजांनी सर्व 20 विकेट घेतल्या
वि दक्षिण आफ्रिका, जोहान्सबर्ग, 2018
विरुद्ध इंग्लंड, नॉटिंगहॅम, 2021
वि दक्षिण आफ्रिका, केप टाउन, 2024*

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR