25.2 C
Latur
Thursday, February 13, 2025
Homeमहाराष्ट्रमहिला व बालविकास विभागात १८ हजार ८८२ पदांची भरती

महिला व बालविकास विभागात १८ हजार ८८२ पदांची भरती

मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाने ७० हजार पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला असून महिला व बालविकास विभागांतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत ५६३९ अंगणवाडी सेविका व १३२४३ अंगणवाडी मदतनीस अशा एकूण १८ हजार ८८२ पदांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

१४ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान मुख्य सेविका पदासाठीही सरळ सेवेच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून ही प्रक्रियाही पारदर्शक पद्धतीने राबवण्याबाबत उचित खबरदारी घेण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिका-यांना दिले. महिला व बालविकास विभागातील विविध रिक्त पदांची भरती करण्याबाबत आदिती तटकरे यांनी मंत्रालयातील दालनात बैठक घेतली. यासोबतच राज्य महिला आयोग, महिला आर्थिक विकास महामंडळ, बालकल्याण समिती, बाल न्याय मंडळातील रिक्त पदांचीही भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी अशा सूचना अधिका-यांना दिल्या आहेत.

यावेळी महिला आणि बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त कैलास पगारे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR