सेलू : स्थुलपणा टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी संतुलित आहार घ्यावा. नियमित खेळावे, व्यायाम करावा. मैद्याचे पदार्थ खाऊ नयेत. दम लागणे, थकवा, आळस, कंटाळा येणे ही स्थुलपणाची लक्षणे जाणवत असतील तर वेळीच आरोग्य तपासणी करून घ्यावी. निरोगी जीवनासाठी नियमीत व्यायाम करावा असे प्रतिपादन डॉ. रूपाली मालाणी यांनी केले.
येथील नूतन विद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजने अतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान निमित्त तंबाखू मुक्त शाळा आणि आरोग्य समितीच्यावतीने प्रशालेच्या रा.ब. गिल्डा सभागृहात मंगळवारी लहान मुलांमध्ये बदलत्या जीवनशैलीमुळे वाढता लठ्ठपणा : कारणे आणि उपाय या विषयावर डॉ. रूपाली मालाणी यांचे व्याख्यान झाले. विद्यार्थीनीसाठी मासिक पाळी संदर्भात डॉ. संध्या लोंढे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक उज्वला लड्डा यांनी केले. सुत्रसंचलन आरती कदम यांनी केले. आभार प्रदर्शन अश्विनी केंद्रे यांनी केले. कार्यक्रमास मुख्याध्यापक संतोष पाटील, अशोक लिंबेकर, सुधीर जोशी, सुरेश हिवाळे, डॉ. काशिनाथ पल्लेवाड, सुनीता सांगुळे, मीरा शेटे, नंदकिशोर चव्हाण, राहुल रोकडे, सुनीता दायमा यांची उपस्थिती होती.