27.5 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeअंतरराष्ट्रीयचिन्मय कृष्ण दास यांची सुटका करा

चिन्मय कृष्ण दास यांची सुटका करा

शेख हसीना यांची मागणी

ढाका : बांगलादेशात चिन्मय कृष्ण दास यांना अटक केली आहे. त्यांच्या अटकेमुळे मोठा गोंधळ सुरू आहे, दास यांच्या अटकेचे प्रकरण अजूनही थांबताना दिसत नाही. कृष्णा दास हे बांगलादेश सनातन जागरण मंचचे प्रवक्ते आणि चितगाव येथील पुंडरिक धामचे प्रमुख आहेत.

बांगलादेशच्या राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली होती. आता या प्रकरणाबाबत बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचेही विधान समोर आले आहे. चिन्मय दास यांची तात्काळ सुटका करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. शेख हसीना यांनी लोकांचे धार्मिक स्वातंत्र्य आणि जीवन आणि मालमत्तेची सुरक्षेभाबतही भाष्य केले आहे.

२८ नोव्हेंबर रोजी एका फेसबुक पोस्टमध्ये बांगलादेश अवामी लीगने चटगावमध्ये वकिलाची हत्या करणा-यांना शिक्षा करण्याबाबत बोलले. माजी पंतप्रधान हसिना यांच्या वतीने पक्षाने लिहिले आहे की, चटगावमध्ये एका वकिलाची हत्या करण्यात आली आहे. या हत्येला तीव्र विरोध होत आहे. या खुनात सहभागी असलेल्यांना लवकरात लवकर शोधून त्यांना शिक्षा व्हावी. या घटनेमुळे मानवी हक्कांचे घोर उल्लंघन झाले आहे.

एक वकील आपली व्यावसायिक कर्तव्ये पार पाडण्यासाठी गेला होता. त्याला मारहाण करणारे लोक दहशतवादी आहेत. ते कोणीही असले तरी त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. शेख हसीना यांनी आपल्या देशातील जनतेला अशा दहशतवाद आणि अतिरेक्यांच्या विरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले. शेख हसीना म्हणाल्या, सध्याचे सत्ताधारी प्रत्येक क्षेत्रात अपयशी ठरत आहेत. दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी, लोकांच्या जीवनाला सुरक्षा प्रदान करण्यात अपयशी ठरले. सर्वसामान्य जनतेवर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे होत असलेल्या या अत्याचारांचा मी तीव्र निषेध करतो असेही शेख हसीना म्हणाल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR