चेन्नई : बिहारमधील प्रसिद्ध यूट्यूबर मनीष कश्यपला न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने मनीष कश्यपची एनएसएच्या आरोपातून मुक्तता केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याच्यावरील आरोपांवर मदुराई कोर्टात सुनावणी झाली. त्यानंतर मदुराई कोर्टाने त्याच्यावरील एनएसए आरोप रद्द केले आहेत. मात्र याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही. मनीष कश्यपच्या वकिलाचे म्हणणे आहे की, कोर्टाचा आदेश हाती आल्यानंतरच ते काही याबाबत सांगू शकतील. त्याचे वकीलही सध्या काही बोलण्याचे टाळत आहेत.
तमिळनाडूमधील बिहारच्या कामगारांवर झालेल्या हल्ल्याचा बनावट व्हीडीओ शेअर केल्याने यूट्यूबर मनीष कश्यपच्या अडचणी वाढल्या होत्या. या प्रकरणी बिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मनीष कश्यपविरोधात एफआयआर नोंदवला होता. याप्रकरणी छापेमारी सुरू असताना मनीष कश्यप अटकेच्या भीतीने अनेक दिवस पळून गेला होता. त्याच्या शोधासाठी अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले. १८ मार्च रोजी बेतिया पोलिसांनी दुसऱ्या एका प्रकरणात मनीषच्या घराची जप्ती सुरू केली तेव्हा तो स्थानिक पोलिस ठाण्यात शरण आला.