24.3 C
Latur
Monday, January 27, 2025
Homeमनोरंजनप्रख्यात सिनेदिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

प्रख्यात सिनेदिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

मुंबई : एकापेक्षा एक उत्तमोत्तम चित्रपटांच्या माध्यमातून भारतीय चित्रपटसृष्टीला समृद्ध करणारे प्रख्यात सिने दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे आज निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. दीर्घकाळापासून आजारी असलेल्या श्याम बेनेगल यांनी आज संध्याकाळी अखेरचा श्वास घेतला.

१४ डिसेंबर १९३४ रोजी जन्मलेल्या श्याम बेनेगल यांनी कलात्मक आणि समांतर चित्रपटांच्या माध्यमातून भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. अंकुर, निशांत, मंथन, जुबैदा, वेलकम टू सज्जनपूर हे त्यांनी दिग्दर्शन केलेले चित्रपट गाजले होते. याशिवाय देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकावर आधारित भारत एक खोज या दूरदर्शनवरील महत्त्वाकांक्षी मालिकेचं दिग्दर्शनही त्यांनी केलं होतं. श्याम बेनेगल यांच्या सिने सृष्टीमधील योगदानाची दखल घेत त्यांना १९७६ मध्ये पद्मश्री, १९९१ मध्ये पद्मभूषण तर २००५ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

मागच्या काही काळापासून वाढत्या वयामुळे श्याम बेनेगल हे प्रकृतीच्या समस्यांचा सामना करत होते. दरम्यान, आज संध्याकाळी सातच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. श्याम बेनेगल यांच्या कन्या पिया बेनेगल यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR