23.4 C
Latur
Thursday, February 6, 2025
Homeमहाराष्ट्रराज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची पुनर्रचना

राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची पुनर्रचना

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात उद्भवणा-या नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींचा सामना करणा-या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची पुनर्रचना करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष असून सदस्य म्हणून उपमुख्यमंत्री तथा वित्त आणि नियोजनमंत्री अजित पवार यांचा समावेश करण्यात आला आहे.

राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची पुनर्रचना करणारा शासन निर्णय गुरूवारी जारी करण्यात आला आहे. त्यानुसार प्राधिकरणाचे सदस्य म्हणून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आपत्ती व्यवस्थापनमंत्री गिरीश महाजन, मदत आणि पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचा समावेश आहे तर अशासकीय सदस्य म्हणून मुंबई आयआयटीचे प्रा. रवि सिन्हा, प्रा. दिपंकर चौधरी यांना प्राधिकरणात स्थान देण्यात आले आहे.

राज्याचे मुख्य सचिव हे प्राधिकरणाचे पदसिद्ध सदस्य तथा मुख्य कार्यकारी अधिकारी असणार आहेत. महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणावरील अशासकीय सदस्यांचा कालावधी हा पुढील आदेशापर्यंत राहील, असे शासन निर्णयात नमूद केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR