22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeसोलापूरभाजप किसान मोर्चाच्या वतीने जिल्हा मध्यवर्ती बँकेला निवेदन

भाजप किसान मोर्चाच्या वतीने जिल्हा मध्यवर्ती बँकेला निवेदन

पंढरपूर – सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक सोलापूर येथे शेतकर्याना मोदी सरकारच्या धोरणा नुसार वाढीव कर्ज पुरवठा करावा व पिक कर्ज भरणाऱ्या शेतकर्याना व नवीन कर्ज मंजूर करुन वाढीव कर्ज देण्यात यावे, ज्या सोसायट्या शंभर टक्के वसुली करतात त्याना कर्ज वाटप करावे, बँक शेतकऱ्यांची असताना ज्या माजी संचालक व कारखानदारांनी कर्ज काढून बँक अडचणीत आणली त्याना पुन्हा कर्ज देऊ नये आदी मागण्यांसाठी बँकेचे प्रशासक कुंदन भोळे आणि बँकेचे व्यवस्थापक देसाई यांना भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली हळणवर याचे नेतृत्वात भेटून निवेदन देण्यात आले.

यावेळी पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश गायकवाड, उपसभापती राजुबापु गावडे, पांडुरंग कारखान्याचे माजी संचालक दिलीप चव्हाण, द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष प्रशांत देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तानाजी पवार, मच्छिंद्र नकाते, प्रमोद बाबर, सर्जे राव होनमाने, धनाजी पवार, सोम नाथ माने आदींसह शेतकरी उपस्थित होते.

यावेळी बोलताना माऊली हळणवर म्हणाले की, केंद्र सरकार व राज्य सरकार शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यासाठी प्राधान्य देत आहे. कर्ज वाटपासाठी प्रचंड निधी उपलब्ध करून दिला जात आहे. या बाबत शासनाकडून तशा सूचना सर्व बँकांना दिल्या जात आहेत मात्र असे असताना सुद्धा सोलापूर जिल्ह्याची शेतकऱ्यांची बँक म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँक आ ळखली जाते. शेतकऱ्यांच्या प्रचंड प्रमाणात शेअर्स व ठेवी देखील या बँकेत असताना सुद्धा ही बँक पाठीमागच्या संचालक मंडळाने गलथान कारभार करत डबघाईला आणली होती. परंतु तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमून बँक नफ्यात आण- ली आहे. मात्र तरीसुद्धा प्रशासक व बँकेचे व्यवस्थापक हे नियमह्यावर बोट ठेवून ज्या कर्जदाराने, सोसायटीने कर्ज शंभर टक्के भरून सुद्धा वाढीव कर्ज शेतकऱ्यांना दिले जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकऱ्यांसाठी प्रचंड योजना राबवत असताना ही बँक सध्या धनदांडग्या कारखान्यांना कर्ज देऊन शेतकऱ्यांना कर्ज देण्यापासून अडचणीत वंचित ठेवत आहेत. बिनव्याजी तीन लाख रुपये कर्ज मिळत असताना सुद्धा या योजनेपासून बँकेच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना कर्जा पासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे आम्ही निवेदन देऊन विनंती केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR