इस्लामाबाद : येत्या ८ फेब्रुवारीला पाकिस्तानात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या लोकसभेत देखील हिंदूंसाठी आरक्षित जागा आहेत. पाकिस्तानच्या निवडणुकांमध्ये हिंदूंबरोबरच अल्पसंख्याकांना देखील १० जागा आरक्षित आहेत.
या निवडणुकीत पहिल्यांदाच सवीरा प्रकाश नावाची हिंदू महिला उमेदवार म्हणून उभी आहे. पाकिस्तानच्या घटनेनुसार लोकसभेत हिंदूंना एकूण २३ जागा दिल्या आहेत.
लोकसभेतील आरक्षित जागा…
पाकिस्तानच्या लोकसभेत एकूण ३४२ जागा आहेत. त्यापैकी ७० जागा आरक्षित आहेत तर इतर अल्पसंख्याकासाठी १०, महिलांसाठी ६० जागा आरक्षित आहेत.
हिंदूंची संख्या २३.१४ कोटी
२०११च्या जनगणनेचा विचार केला तर पाकिस्तानमध्ये एकूण १.६ टक्के हिंदू राहत आहेत. पाकिस्तानमध्ये हिंदूंची लोकसंख्या वाढली असली तरी त्यांची प्रगती झालेली दिसत नाही. सध्याच्या पाकिस्तानमधील एकूण लोकसंख्येचा विचार केला तर ती २३.१४ कोटी एवढी आहे.
हिंदू मतदार १८ लाख
पाकिस्तानच्या लोकसभेत एकूण ३४२ जागा आहेत त्यापैकी पंजाब मतदारसंघातच ५१ टक्के जागा आहेत. पाकिस्तानचा विचार करता १८ लाख हिंदू मतदार तेथे आहेत. तसेच ३६ लाख अल्पसंख्याक मतदार आहेत. तेथे महिलांपेक्षा पुरुष मतदारांचे मतदारांचे प्रमाण अधिक आहे.