मुंबई : मानधनवाढ, प्रलंबित भत्ते, वसतीगृहांची स्थिती याबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही सरकारकडून मागण्यांची पूर्तता होत नसल्याने निवासी डॉक्टरांची केंद्रीय संघटना असलेल्या ‘मार्ड’ने ७ फेब्रुवारीपासून बेमुदत संप पुकारण्यात निर्णय घेतला आहे.
या संपामध्ये राज्यातील सर्व शासकीय महाविद्यालयांमधील निवासी डॉक्टर सहभागी होणार आहेत. निवासी डॉक्टरांच्या विविध मागण्यांसाठी जानेवारी २०२३ मध्ये संप केला होता. त्यावेळी सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन मिळाल्याने संप मागे घेण्यात आला होता. मात्र वर्ष उलटले तरी सरकारकडून ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे ७ फेब्रुवारीपासून राज्यव्यापी संप पुकारण्यात येईल, असा इशारा निवासी डॉक्टरांनी सरकारला दिला आहे.