14.4 C
Latur
Thursday, November 28, 2024
Homeमहाराष्ट्रपंकजा मुंडेंच्या कट्टर समर्थकाचा राजीनामा

पंकजा मुंडेंच्या कट्टर समर्थकाचा राजीनामा

  भाजपच्या पारंपरिक गडात खिंडार बीडच्या राजकीय वर्तुळात खळबळ

बीड : प्रतिनिधी
भाजपची आज पहिली यादी जाहीर झाली तर तिथे भाजपच्या पारंपरिक गडात खिंडार पडले आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक राजेंद्र मस्के यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली आहे. भाजप पदाधिकारी म्हणून राजीनामा देऊन भारतीय जनता पार्टीचा त्याग करत असल्याची फेसबुक पोस्ट टाकत राजीनाम्याची घोषणा केली आहे.

राजेंद्र मस्के यांनी अचानक जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने बीडच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या घोषणेवेळी मोठ्या संख्येने मस्के यांचे समर्थक कार्यालयात जमले होते. निवडणूक काळात नेहमी होत असलेल्या अन्यायामुळे हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपने आपला पारंपरिक गड काबीज करण्यासाठी पंकजा मुंडेंना रिंगणात उतरवले होते. पण जातीय समीकरणांमुळे वारे फिरले आणि भाजपला मोठा पराभव पत्करावा लागला. तर आता पंकजांना विधान परिषदेची आमदारकी देऊन त्यांचे पक्षाने पुनर्वसन केले. तर आता धनंजन मुंडेही महायुतीसोबत जोडले गेल्याने बीडमध्ये दोन्ही बहीण- भाऊ एकत्रितपणे ताकद लावताना दिसत आहेत. पण नेमके उमेदवार जाहीर होण्याआधीच भाजपच्या पदाधिका-यानेच राजीनामा दिल्याने भाजपसमोर संघटनात्मक आव्हान उभे राहणार आहे.

लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या विजयासाठी प्रतिकूल सामाजिक परिस्थितीत यंत्रणा उभी केली. विजयासाठी कष्ट घेतले. पण दुर्दैवाने पराभवानंतर व्यक्त केलेली शंका मनाला वेदना देणारी आहे. पराभवाचे खापर एकट्या मराठा समाजावर फोडून मोकळे झाले, अशी खंत मस्के यांनी आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR