लातूर : प्रतिनिधी
येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात आयक्यूएसी, युवती मंच, सांस्कृतिक विभाग आणि विद्यार्थी परिषदेच्या संयुक्त्त विद्यमाने मकर संक्रांतीचे औचित्य साधून ट्रॅडिशनल डे साजरा करण्यात आला. यावेळी पारंपरिक वेशभूषा स्पर्धा उत्सहात झाली. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई हे होते तर विचारपीठावर वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्रचार्य डॉ. राजकुमार लखादिवे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. संजय पवार, पर्यवेक्षक प्रा. शिवशरण हावळे, आयक्यूएसीचे समन्वयक डॉ. आनंद शेवाळे, विद्यार्थी परिषदेचे प्रमुख डॉ. बाळासाहेब गोडबोले, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. रत्नाकर बेडगे, युती मंचाच्या डॉ. शितल येरुळे आणि प्रा. वनिता पाटील, संगीत विभागाचे प्रमुख प्रा. विजयकुमार धायगुडे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन दीप प्रज्वलन करण्यात आले. कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्या ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती याकरिता परीक्षक म्हणून प्रा. विश्वनाथ स्वामी, डॉ. जितेंद्र देशमुख, डॉ. राहुल डोंबे आणि प्रा. शिवगंगा तुपकरी काम पहिले. कनिष्ठ विभाग सर्वप्रथम मनस्वी बावस्कर, बारावी कला सर्व द्वितीय कांबळे सायली, बारावी कला सर्व द्वितीय क्रमांक विभागून आरती वाघमारे, बारावी विज्ञान सर्व तृतीय क्रमांक ओंकार लोंढे, बारावी वाणिज्य श्रेया शिरसाठ, बारावी विज्ञान विभागून सर्व तृतीय तर वरिष्ठ महाविद्यालयातील निकाल सर्वप्रथम कु. माधुरी भातलवंडे, बीएससी प्रथम, सर्व द्वितीय विभागून रोहिणी बाचके, बी कॉम द्वितीय वर्ष, मीनाक्षी ठाकरे, एम. ए. प्रथम वर्ष, सर्व तृतीय विभागून स्वामी सायली, बीकॉम प्रथम वर्ष, मानसी बनशेट्टी, बीए द्वितीय वर्ष. या विजेत्या सर्व स्पर्धकांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
तसेच भूगोल दिन आणि मकर संक्रांतीचे औचित्य साधून प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई, उपप्राचार्य डॉ. राजकुमार लखादिवे, उपप्राचार्य प्रा. संजय पवार यांनीही मकर संक्रांतीचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वनिता पाटील यांनी केले तर आभार डॉ. रत्नाकर बेडगे यांनी मानले. कार्यक्रमाला प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता कार्यालयीन प्रमुख नामदेव बेंदरगे, बालाजी डावकरे, आनंद खोपे, सय्यद जलील, अशोक शिंदे, सोनाली लोंढे आणि भीमाशंकर सुगरे आदींनी परिश्रम घेतले.