32.7 C
Latur
Thursday, February 20, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यात यात्रांवर निर्बंध आणणार?

राज्यात यात्रांवर निर्बंध आणणार?

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांचे संकेत

बुलढाणा : जीबीएसचा वाढता धोका पाहता राज्यातील यात्रांवर निर्बंध आणले जाऊ शकतात. लवकरच अधिकारी आणि प्रशासनाची बैठक घेऊन यावर निर्णय घेणार असल्याची मोठी घोषणा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची केली. जर हा आजार संसर्गजन्य असल्याचे समोर आले तर त्यावर कडक उपाययोजना केल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जीबीएस हा आजार जर गर्दीमुळे होत असल्याचे किंवा संसर्गजन्य असल्याची माहिती मिळाली तर वैद्यकीय अधिकारी आणि प्रशासनाची बैठक घेऊन लवकरच राज्यातील यात्रांवर निर्बंध आणण्यात येईल. तसेच बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी असलेल्या सैलानी यात्रेवरही निर्बंध आणण्याबाबत विचार सुरू आहे, असेही जाधव म्हणाले. गुइलेन-बॅरे सिंड्रोम हा एक दुर्मीळ स्वयंप्रतिकार स्वरुपाचा विकार आहे, ज्यात शरीराची रोगप्रतिकारशक्ती स्वत:च्याच चेतासंस्­थांवर हल्ला करते.

यामुळे स्रायू कमजोर होतात आणि गंभीर रुग्णामध्ये पक्षाघातही होऊ शकतो. हा आजार संसर्गजन्य नाही. या आजाराचे निश्चित कारण अज्ञात आहे. हा आजार एखाद्या श्वसन किंवा पचनसंस्थेच्या संसर्गानंतर होतो. त्यावर तातडीने उपचार करणे आवश्यक आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR