29.1 C
Latur
Wednesday, November 13, 2024
Homeहिंगोलीमहसूल प्रशासन निवडणूक कामात व्यस्त ; आन रेतीमाफीयांचे चांगभलं....!

महसूल प्रशासन निवडणूक कामात व्यस्त ; आन रेतीमाफीयांचे चांगभलं….!

(सेनगाव तालुक्यात रेती माफीयांची मुजोरी, पथक केवळ उरले नावालाच)

सेनगाव (बबन सुतार): सेनगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेतीचे घाट असताना जिल्हा महसूल प्रशासनाने कुठल्याही रेती घाटाचा अधिकृत लिलाव न झाल्याने महसूल प्रशासन गुतले निवडणूक कामात आणि रेती माफीयांचं आर्थिक चांगभलं होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे परंतु या अवैध रेती वाहतुकीला रोखणारे महसूल पथक केवळ नावालाच उरल्याने रेती माफीयांची मुजोरी वाढल्याचे बोलल्या जात आहे.

सेनगाव तालुक्यातील ब्रह्मवाडी बन, बरडा, लिंबाळा हुडी, बोडखा, चिखलागर यासह इतर ठिकाणच्या रेती घाटात मुबलक प्रमाणात रेती साठा उपलब्ध आहे परंतु संबंधित रेती घाटाच्या लिलावाबाबत जिल्हा महसूल प्रशासनाकडून अद्यापही रेती घाटाचे अधिकृत निलाव प्रक्रिया पूर्ण झालेली नसताना तालुक्यातील रेती घाटावर अवैध माफीयांनी कब्जा करून लाखो रुपयांचा अवैध रेती उपसा करण्याचा सपाटा लावला आहे या गंभीर बाबीकडे जिल्हा प्रशासन लक्ष देणार का? असा सवाल व्यक्त करण्यात येत आहे.

रेती घाटालगत असलेल्या गावातील नागरिकांनी केवळ आन केवळ अवैध रेती उपसा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात टिप्पर व जेसीबी सारख्या महागड्या साहित्याची खरेदी करण्याचा सपाटा लावला आहे कारण त्यांना माहित आहे आपल्या गावालगत लगत काळ्या सोन्याची खान म्हणजेच अवैध रेती उत्खननासाठी अनुकूल आहे हे त्यांना ज्ञात आहे तर अवैध रेती उपसा हा खेळ रात्री चाले या खेळातून महसूल प्रशासनाचा लाखो रुपयांचा अधिकृत महसूल बुडवण्याचा गंभीर प्रकार घडविल्या जात असल्याने नागरिका तून चर्चेला उधाण आले आहे

दरम्यान तालुक्यातील बोडखा, चिखलागर, हुडी लिंबाळा, ब्रम्हवाडी येथील रेती माफिया अवैध रेती विक्रीच्या व्यवसायातून लाखो रुपयांची संपत्ती जमा करून संपत्तीच्या जोरावर गुन्हेगारी मार्गाचा अवलंब करून अनेक संविधानिक व्यक्तींना अवैध रेती संदर्भात जबाब विचारले असता रेती माफियाकडून घातपात करण्याची भाषा करून नेहमीच मुजोरी करत असल्याच्या घटना घडत आहेत या प्रकारातून अवैधरीती रेती विक्री मार्गातून दोन गटात गंभीर घटना घडण्याची शक्यता असल्याचे बोलल्या जात आहे.

एकंदरीत अवैध रेती विक्रीचा गोरख धंदा जोमाने चालू असून रेती माफीयामध्ये अवैध उपसा करण्याचा एक प्रकारे स्पर्धा सुरू झाली असून या स्पर्धेचा फायदा संबंधित तालुक्यातील महसूल पथकाला आर्थिक चांगभलं होत असल्याचा आरोप होत आहे. सेनगाव तालुक्यात सरास होत असलेल्या अवैध रेती उत्खननाने रेती माफिया प्रचंड मालामाल झाले असून गोरगरीब घरकुल लाभार्थ्यांना घर बांधणीसाठी रेती मिळणे अवघड झाले आहे तर दुसरीकडे महसूल प्रशासनाच्या एका बड्या अधिकाऱ्यांशी आर्थिक सलगी निर्माण करून बिंनदिक्तपणे रेती उपसा सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून केल्या जात आहे

हिंगोली जिल्ह्याला लाभलेले कर्तव्यदक्ष व शिस्तप्रिय ख्याती असलेले जिल्हाधिकारी अभिनय गोयल यांनी अवैध रेतीच्या उपशा संबंधी पाठबळ देणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा शोध घेऊन व अवैध रेती उपसा करणाऱ्या विरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR