26.7 C
Latur
Friday, February 21, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यात पुन्हा पावसाचा धोका

राज्यात पुन्हा पावसाचा धोका

बंगाल उपसागरात चक्रीवादळ

पुणे : भारतात पुन्हा नव्या चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर चक्रीवादळात होणार आहे. यामुळे ३ डिसेंबर रोजी नैऋत्य बंगालच्या उपसागरात ‘मिचौंग’ चक्रीवादळ येणार आहे.

त्याचा परिणाम महाराष्ट्रावर होणार आहे. महाराष्ट्रात त्यामुळे पुन्हा अवकाळी पाऊस पडणार आहे. चक्रीवादळामुळे विदर्भासह उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण येथे शुक्रवारी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तसेच देशाच्या दक्षिण भागात चक्रीवादळाचा परिणाम जाणवणार आहे.

तीन ते पाच डिसेंबरपर्यंत परिणाम
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे निर्माण झालेले क्षेत्र चक्रीवादळात बदलणार आहे. ३ डिसेंबरपासून ५ डिसेंबरपर्यंत देशात मुसळधार पाऊस पडणार आहे. चक्रीवादळामुळे तामिळनाडू किनारपट्टी आणि आंध्र प्रदेशात भारतीय हवामान विभागाने ‘ऑरेंज’ अलर्ट जारी केला आहे. कटऊ कडून तामिळनाडूमधील उत्तर किनारपट्टी, पुद्दुचेरी आणि कराईकल येथे अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR