सोलापूर : सोलापूर पुणे महामार्गावरील सावळेश्वर टोल नाक्यावर रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त सडक सुरक्षा जीवन रक्षा हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश राऊत, सोलापूर जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील, चिंचोली एमआयडीसी चे मुख्य फायर अभियंता दिनेश अंदोरे, भारतीय राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता महेश येमूल, अनिल विपत, एल्सामेक्स कंपनीचे प्रोजेक्ट डायरेक्टर दाऊत राजा साब खान, मेंटेनन्स मॅनेजर असीम रेडी, सावळेश्वर चे सरपंच धनाजी गावडे हे उपस्थित होते.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे दाऊत खान, असीम रेड्डी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाहतूक नियमांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना सेफ्टी जॅकेट देण्यात आले.
प्रारंभी ट्रॅफिक पोलीस हवालदार रोडे यांनी नियम मोडल्यानंतर कोणत्या कलमान्वये किती दंड लागतो याची माहिती दिली.
… मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश राऊत म्हणाले मोहोळ हद्दीत वर्षभरात अपघातात 90 लोक मृत्युमुखी पावतात…यावेळी पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले… मुख्य अग्निशमन अभियंता दिनेश अंदोरे यांनीही बाबत मार्गदर्शन केले. यावेळी भारतीय राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी अनिल विपत यांनी उपस्थितांना वाहतूक नियम पाळण्याबाबत शपथ दिली.