29.1 C
Latur
Sunday, February 23, 2025
Homeमहाराष्ट्रशिवाजी पार्कमधील प्राणिसंग्रहालयावर दरोडा!

शिवाजी पार्कमधील प्राणिसंग्रहालयावर दरोडा!

अजगर, घोरपडी, पाल अन् सरड्यांची चोरी!!

मुंबई : शिवाजी पार्कमधील मरीन अ‍ॅक्वा झूमधून प्राणी चोरीला गेले आहेत. सहा अजगरांसह दोन घोरपडी, एक पाल आणि एक सरडा चोरीला गेला आहे. चोरीला गेलेले सगळे प्राणी परदेशी प्रजातीचे आहेत. झूमधील कथित अनधिकृत बांधकामावर बीएमसीने सोमवारी कारवाई केली होती. झूमधील अनधिकृत बांधकाम तोडताच एक्झॉटिक अ‍ॅनिमल चोरीला गेले आहेत.

प्राणिसंग्रहालयावरील कारवाईमागे राजकीय सूडबुद्धी असल्याचा प्राणिसंग्रहालय प्रशासनाने आरोप केला आहे. शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. प्राणिसंग्रहालयाच्या विश्वस्तांच्या तक्रारीनंतर अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राणिसंग्रहालयातील अनधिकृत बांधकामावर सोमवारी मुंबई महापालिकेची तोडक कारवाई करण्यात आली. ‘झू’मधील अनधिकृत बांधकाम तोडताच एक्झॉटिक अ‍ॅनिमल चोरीला गेले आहेत. प्राणिसंग्रहालयावरील कारवाईमागे राजकीय सूडबुद्धी असल्याचा प्राणिसंग्रहालय प्रशासनाचा आरोप आहे.

प्राणिसंग्रहालयाच्या शेजारी असलेल्या पालिकेच्या जलतरण तलावामध्ये मगरीचे पिल्लू सापडल्यानंतर प्राणिसंग्रहालय चर्चेत आले होते. शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. प्राणिसंग्रहालयाच्या विश्वस्तांच्या तक्रारीवर गुन्हा दाखल केला आहे. चोरी झालेल्या प्राण्यांची किंमत साडेचार लाख रुपयांच्या घरात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR