22.2 C
Latur
Tuesday, February 11, 2025
Homeक्रीडारोहित शर्माने केला षटकारांचा नवा विक्रम

रोहित शर्माने केला षटकारांचा नवा विक्रम

कटक : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे, हे त्याने पुन्हा एकदा कटकच्या मैदानावर दाखवून दिले. भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू आहे. रोहितने मालिकेतील दुस-या एकदिवसीय सामन्यात षटकारांचा एक विक्रम मोडला.

आता एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक षटकार ठोकण्याच्या बाबतीत तो दुस-या क्रमांकावर पोहोचला आहे. रोहितने वेस्ट इंडिजचा दिग्गज क्रिकेटर ख्रिस गेलला मागे टाकले आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात कटक येथे दुसरा एकदिवसीय सामना खेळला जात आहे. या सामन्यात रोहित शर्मा शुभमन गिलसोबत ओपनिंग करण्यासाठी आला. या खेळीत त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याचा ख्रिस गेलचा विक्रम मोडला. रोहित आणि गिलने भारताला धमाकेबाज सुरुवात करून दिली आहे.

सध्या एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकम्याचा विक्रम माजी पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीच्या नावावर आहे. त्याने ३९८ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३५१ षटकार ठोकले आहेत. आता रोहित या यादीत दुस-या स्थानावर आला आहे. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात पहिला षटकार मारताच रोहितनं ख्रिस गेलला ओव्हरटेक करत आपल्या खात्यात ३३२ षटकारांची नोंद केली.

इंग्लंड विरुद्धच्या दुस-या सामन्यातील भारताच्या डावातील २० व्या षटकापर्यंत रोहितच्या भात्यातून ५ सिक्सर निघाले होते. गेलने ३०१ सामन्यांमध्ये ३३१ षटकार ठोकले आहेत. महेंद्रसिंग धोनी यादीत पाचव्या स्थानावर आहे. त्याने ३५० एकदिवसीय सामन्यांमध्ये २२९ षटकार ठोकले आहेत.

भारतासमोर ३०५ धावांचे आव्हान
भारताने मालिकेतील पहिला सामन्यात विजय मिळवला आहे. दुस-या सामन्यात इंग्लंडने जबरदस्त पुनरागमन करत भारतासमोर ३०५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. तत्पूर्वी, रवींद्र जडेजाने शानदार गोलंदाजी करत १० षटकांत ३५ धावा देत ३ बळी घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR