21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्ररोहित-युगेंद्र पवारांच्या जीवाला धोका

रोहित-युगेंद्र पवारांच्या जीवाला धोका

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपानंतर आता काँग्रेस उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. महाविकास आघाडीतील काही जागांवर अद्याप एकमत होताना दिसत नाही. त्यातच दुसरीकडे मनसेच्या महायुतीतील सहभागावरून चर्चा सुरू आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार तसेच युगेंद्र पवार यांच्या जीविताला धोका आहे. त्यांना तातडीने सुरक्षा द्या, असे पत्र खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे पोलिसांना लिहिले आहे.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी युगेंद्र पवार यांना घेराव घातला होता. सोशल मीडियावर अजित पवार यांची बदनामी सुरू आहे, ती थांबवावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. यावर शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून काही चुका झाल्या असतील तर दुरुस्त करू, असे आश्वासन युगेंद्र पवार यांनी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना दिले. श्रीनिवास पवार यांनी लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी युगेंद्र पवारांना घेराव घालत जाब विचारला, असे सांगितले जात आहे. यावरून आता सुप्रिया सुळे यांनी पुणे पोलिसांना एक पत्र लिहून तातडीने सुरक्षा पुरवावी, अशी विनंती केली आहे.

सुळेंनी पोलिसांना लिहिले पत्र
लोकसभा निवडणूक प्रचारार्थ आमदार रोहित पवार व युगेंद्र पवार हे दौ-यामध्ये ठिकठिकाणी जात आहेत. संविधानिक पद्धतीने, शांतपणे व लोकशाही मार्गाने लोकांशी सुसंवाद साधत आहेत. परंतु काही ठिकाणी त्यांना दडपशाहीचा सामना करावा लागत आहे. काही लोक घेराव घालून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. विविध वृत्तवाहिन्या व समाज माध्यमातून ही घटना सर्वांसमोर आली. संबंधितांची ही कृती पूर्णपणे असंविधानिक आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR