24.3 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeक्रीडाराजस्थानचा रॉयल विजय

राजस्थानचा रॉयल विजय

अहमदाबाद : संजू सॅमसनच्या राजस्थानने आरसीबीचा पराभव करत क्वालिफायरचे तिकिट मिळवले आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर एलिमेनटरच्या सामन्यात राजस्थानने आरसीबीचा चार विकेटने पराभव केला. आरसीबीने दिलेले १७३ धावांचे आव्हान राजस्थानने १९ षटकांत सहा विकेटच्या मोबदल्यात सहज पार केले.

आरसीबीचा अहमदाबादमध्ये पराभव करत राजस्थानने चेन्नईचे तिकिट मिळवले आहे. राजस्थान आता क्वालिफायर २ मध्ये हैदराबादविरोधात भिडमार आहे. हैदराबादला कोलकात्याकडून क्वालिफायर एक मध्ये पराभवाचा सामना करावा लागला. २४ मे रोजी चेन्नईमध्ये हैदराबाद आणि राजस्थान यांच्यामध्ये आमनासामना होणार आहे. यामधील विजेता संघ २६ मे रोजी कोलकात्याशी भिडणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR