22.4 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रवक्फ बोर्डाला निधी दिल्याने आरएसएस, व्हीएचपी शिंदे सरकारवर नाराज

वक्फ बोर्डाला निधी दिल्याने आरएसएस, व्हीएचपी शिंदे सरकारवर नाराज

मुंबई : प्रतिनिधी
विश्व हिंदू परिषद या दिवसांमध्ये महाराष्ट्र महायुती सरकारवर नाराज आहे. व्हीएचपी महाराष्ट्र सरकारच्या वक्फ बोर्डाला १० कोटी रुपये धनराशीचे अनुदान देण्याच्या निर्णयाला विरोध करत आहे.

दरम्यान, राज्य सरकारने नुकतीच वक्फ बोर्डाला १० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली होती. ही घोषणा सध्या चांगलीच वादात सापडली आहे. या मुद्यावरून अनेकजण शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य करत आहेत. व्हीएचपीचे म्हणणे आहे की, सरकारने वक्फ बोर्डाला १० कोटी रुपये देण्याची घोषणा करत अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी २ कोटी रुपये दिले आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहयोगी संघठन विश्व हिंदू परिषद या दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या महायुती सरकारच्या या भूमिकेवरून नाराज आहेत. व्हीएचपीचे म्हणणे आहे की, सरकारने वक्फ बोर्डाला १० कोटी रुपये देण्याची घोषणा करत अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी २ कोटी रुपये दिले आहेत. व्हीएचपीच्या कोकण डिव्हिजन सचिव मोहन सालेकर यांनी सांगितले की, ते वक्फ बोर्डाला निधी वाटप करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचा विरोध करीत आहेत.

ते म्हणाले की, महायुती सरकार ते करत आहे जे काँग्रेस सरकारने देखील केले नाही. सरकार धार्मिक समुदायाचे तुष्टीकरण करीत आहे. जर या निर्णयाला परत नाही घेतले गेले तर महायुतीच्या उमेदवारांना स्थानिक नागरिक आणि विधानसभेच्या आगामी निवडणुकांमध्ये हिंदूंच्या नाराजीचा सामना करावा लागेल. तसेच व्हीएचपीच्या विरोधावर प्रतिक्रिया देत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राउत म्हणाले की, ते विरोध करू शकतात कारण त्यांना कोणी थांबवले आहे. त्यांनीच या सरकारला आणले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR