30.8 C
Latur
Sunday, May 26, 2024
Homeमहाराष्ट्रआरटीई ऑनलाइन प्रवेशास मंगळवारपासून सुरुवात

आरटीई ऑनलाइन प्रवेशास मंगळवारपासून सुरुवात

पुणे : आरटीई पोर्टलवर तब्बल दीड महिने चार ते पाच वेळा मुदतवाढ देत शाळा नोंदणीसह रिक्त जागांची आकडेवारी अद्ययावत केल्यानंतर अखेर ऑनलाईन प्रवेश अर्जासाठी राज्य शासनाला मुहूर्त मिळाला आहे. आरटीई अंतर्गत रिक्त असलेल्या २५ टक्के आरक्षित जागांवर प्रवेश घेण्यासाठी पालकांना दि. १६ एप्रिल म्हणजेच आजपासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत.

आरटीई पोर्टलवर शाळांची नोंदणी पार पडल्यानंतर आरटीई कायद्यांतर्गत दुर्बल, वंचित, शैक्षणिक व सामाजिकदृष्टया मागासवर्ग घटकांकरिता २५ टक्के रिक्त जागांवर विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन माध्यमातून अर्ज करण्यास सुरूवात होते. मात्र, यंदा आरटीई प्रवेश प्रक्रियेला तब्बल दोन महिने उशिराने सुरूवात झाली आहे. त्यात दीड महिना केवळ शाळांची नोंदणी करण्यामध्ये गेला आहे. त्यामुळे ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत अर्ज करण्यास केव्हा सुरूवात होणार? याची पालक मागील अनेक महिन्यापासून अतुरतेने वाट पाहत होते.

राज्यात ७५ हजार ९७४ शाळांनी आरटीई पोर्टलवर नोंदणी केली आहे. या शाळांमध्ये आरटीई अंतर्गत २५ टक्के रीक्त असलेल्या ९ लाख ७२ हजार ८२३ जागा अद्ययावत केल्या आहेत. खासगी शाळांसह शासकीय, अनुदानित शाळांचा समावेश आहे. पालकांना दि. १६ ते ३० एप्रिल या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR