24.2 C
Latur
Monday, July 1, 2024
Homeसोलापूरकडुलिंबाच्या पाल्याचा रस जनावरांच्या अंगाला चोळा

कडुलिंबाच्या पाल्याचा रस जनावरांच्या अंगाला चोळा

करमाळा : दरवर्षी पावसाळ्यामध्ये माशांचा त्रास जनावरांना जाणवतो.परंतु यावर्षी माशांचे प्रमाण जरा जास्त आहे. पशुपालकांनी आपल्या गोठ्यांची स्वच्छता ठेवून गोठ्यातील जनावरे बाहेर काढून कीटकनाशकांची फवारणी करावी. दिवसातून एक वेळा कडुलिंबाचा पाला जाळून त्याचा धूर करावा किंवा कडुलिंबाच्या पाल्याचा रस जनावरांच्या अंगाला चोळावा, यासारखे उपाय केल्यास जनावरांना होणाऱ्या त्रासाची तीव्रता काही प्रमाणात कमी होईल. असे पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. एन. होळकर यांनी सांगीतले.

पाऊस पडल्यानंतर सध्या मोठ्या प्रमाणावर सर्वत्र घोगावणाऱ्या माश्यांचा जनावरांना मोठा उपद्रव जाणवत असून, याचा दूधसंकलनावर परिणाम जाणवू लागला आहे. दैनंदिन संकलनात दहा ते पंधरा टक्के घट झाली असल्याचे चित्र आहे. सध्या सर्वत्र घोगवणाऱ्या माश्यांचा सर्वात मोठा त्रास जनावरांना होत आहे. या जनावरांना चावा घेत असल्याने जनावरांना त्याचा मोठा उपद्रव होतो, चारा खाण्यासाठीही अडचणी येत असून दिवसभर सतत या माश्यांना हुसकवण्याची कसरत करावी लागत असल्याने जनावरे हैराण झाली आहेत. याचा परिणाम जनावरांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे.

पावसाळ्यात होणाऱ्या जनावरांना माशांचा त्रासाची तीव्रता यावर्षी जास्त जाणवत असून, यामुळे सर्वत्र होणाऱ्या दैनंदिन दूध संकलनामध्ये दहा ते पंधरा टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. आधीच दुधाचे दर कमी मिळत असल्याने अडचणीत असलेल्या पशुपालकांना याचा मोठा फटका बसत आहे. माश्यांच्या त्रासाने अनेक जनावरे दिवसभर मोठ्याने ओरडत आहेत.खाली बसून विश्रांती घेत नाहीत व रवंथही करू शकत नाहीत.याचा सर्वांत मोठा फटका पशुपालकांना बसत असून, याचा परिणाम दूध संकलनावर झाला आहे. शेतकऱ्यांनी याबाबत काळजी घेण्याची गरज आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR