22 C
Latur
Sunday, January 12, 2025
Homeराष्ट्रीय१ फेब्रुवारीपासून ६ मोठे नियम बदलणार

१ फेब्रुवारीपासून ६ मोठे नियम बदलणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
१ फेब्रुवारीपासून ६ मोठ्या नियमांत बदल होणार आहेत. याचा फटका थेट सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे. यामध्ये ज्यांनी अद्याप फास्टॅग केवायसी करण्याचे काम पूर्ण केलेले नाही. त्यांचे फास्टॅगवर बंदी किंवा ते काळ््या यादीत टाकले जाणार आहेत. त्यामुळे याचा फटका वाहनधारकांना बसू शकतो. यासोबतच आणखी काही नियम बदल होणार असल्याने याची झळ थेट सर्वसामान्यांना बसणार आहे. त्यामुळे ३१ तारखेपर्यंत आवश्यक ते बदल करून घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला सरकार नियमात बदल करीत आहे. जानेवारी महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. त्यानंतर फेब्रुवारी महिना सुरू होईल. या महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच १ फेब्रुवारी रोजी ६ मोठ्या नियमांत बदल होणार आहेत. त्यामुळे तत्पूर्वीच आवश्यक ते बदल करून घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, काही नियम व्यवहारिकदृष्ट्या हिताचे असल्याचे मानले जात आहे. यामध्ये आरबीआयने आता लाभार्थींचे नाव न जोडता तुमच्या बँक खात्यातून ५ लाख रुपये ट्रान्सफर करण्याची मुभा दिली आहे. गेल्या वर्षी एनपीसीआयने ३१ ऑक्टोबर रोजी याबाबत परिपत्रक जारी केले होते. आता त्याची अंमलबजावणी होणार असल्याने आता मोठी रक्कम ट्रान्सफर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दरम्यान, ज्यांनी अद्याप फास्टॅग केवायसी करण्याचे काम पूर्ण केलेले नाही. त्यांनी त्यांचे फास्टॅग ३१ तारखेच्या आत केवायसी पूर्ण करून घेणे आवश्यक आहे अन्यथा फास्टॅगवर बंदी घातली जाणार आहे किंवा असे फास्टॅग काळ््या यादीत टाकले जाणार आहेत. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने फास्टॅग केवायसी अपडेट करण्यासाठी ३१ जानेवारी ही अंतिम तारीख निश्चित केली आहे. त्यामुळे तात्काळ केवायसी करून घेणे गरजेचे आहे.

१२ जानेवारी २०२४ रोजी पीएफआरडीएने एनपीएस आंशिक पैसे काढण्याबाबत एक परिपत्रक जारी केले. आता ते १ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. या परिपत्रकात एनपीएस खातेधारकांच्या वैयक्तिक पेन्शन खात्यातून नियोक्ता येगदान वगळता २५ टक्के पर्यंत रक्कम काढली जाऊ शकते. यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. त्यानंतर सरकारी नोडल ऑफिस प्राप्तकर्त्याला नामांकित करते. पडताळणीनंतर आंशिक पैसे काढता येतील.

३१ जानेवारीपर्यंतच गृहकर्जात सवलत
स्टेट बँक ऑफ इंडिया विशेष गृहकर्ज मोहीम राबवित आहे. यामध्ये गृहकर्जावर ६५ बीपीएस पर्यंत सूट दिली जात आहे. तुम्ही ३१ जानेवारी २०२४ पर्यंतच गृहकर्जावर प्रक्रिया शुल्कात सवलत मिळवू शकता. त्यामुळे याबाबतची प्रक्रियादेखील पूर्ण करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. यासोबतच पंजाब आणि सिंध बँकेद्वारे चालवल्या जाणा-या धनलक्ष्मी ४४४ डेज नावाच्या एफडीचा लाभ ३१ जानेवारी २०२४ पर्यंतच मिळू शकणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR