24.1 C
Latur
Monday, December 23, 2024
Homeअंतरराष्ट्रीयभरधाव बस ट्रकला धडकून पेटली; ३८ जणांचा होरपळून मृत्यू

भरधाव बस ट्रकला धडकून पेटली; ३८ जणांचा होरपळून मृत्यू

ब्राझीलमधील भीषण घटना

ब्राझिलिया : ब्राझीलमध्ये अपघाताची भीषण घटना समोर आली आहे. बस आणि ट्रकमध्ये झालेल्या अपघातानंतर बसला लागलेल्या आगीत ३८ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर ४ जण गंभीर जखमी आहेत. एका कारला देखील बसने धडक दिली. बसमधली जवळपास सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघात घडला त्यावेळी बसमधून ४५ प्रवासी प्रवास करत होते. ज्यामधील ३८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये बस चालकाचाही समावेश आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय वेळेनुसार शनिवारी पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाला. बसचा अतिशय वेगात होती असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. ट्रकही वेगात होता. अचानक बसचा टायर फुटला. त्यांतर अनियंत्रित बस ट्रकला जाऊन धडकली. बस आणि ट्रक वेगात असल्याने स्फोट होऊन बसला आग लागली.

बसला आग लागल्यानतंर बसमधील प्रवाशांना जीव वाचवण्यासाठी धडपत केली. प्रवाशांच्या किंचाळण्याचे आवाज ऐकू येत होता. अपघात पाहून रस्त्यावरून जाणा-यांनीही आरडाओरडा सुरू केला. पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली, त्यांतर बचावकार्य सुरू झाले. बसला लागलेल्या आगीचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. फॉरेन्सिक तपासणीनंतरच अपघात नेमका कशामुळे झाला हे कळू शकेल. ब्राझीलच्या वाहतूक मंत्रालयाच्या नोंदीनुसार, २०२४ मध्ये १०,००० पेक्षा जास्त लोकांना अपघातात आपला जीव गमावावा लागला आहे. सप्टेंबर २०२४ मध्येही ब्राझीलच्या फुटबॉल खेळाडूंनी भरलेली बस उलटली होती. या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR