कीव्ह : वृत्तसंस्था
रशिया आणि युक्रेनचे युद्ध आज भयानक वळणावर पोहचले आहे. युक्रेनच्या सुमी शहरात रशियाने बॅलिस्टीक क्षेपणास्रे डागली आहेत. रविवारी झालेल्या या विध्वंसक हल्ल्यात २१ हून अधिक लोक ठार झाले आहेत. या हल्ल्यात निवासी भागातील शाळा, रस्ते उद्धवस्त झाले आहेत.
युक्रेनने आता जगाला रशियाविरोधात दबाव आणण्यासाठी आवाहन केले आहे. हा हल्ला रशिया आणि युक्रेन युद्धाला धोकादायक वळणावर घेऊन जाऊ शकतो असे म्हटले जात आहे. रशियाने युक्रेनच्या सुमी नावाच्या शहरावर बॅलिस्टीक क्षेपणास्रांनी हल्ले चढवले आहे. त्यामुळे सुमी शहरातील निवासी भागातील शाळा, इमारती, कार आणि सार्वजनिक रस्ते सर्वकाही नष्ट झाले आहे. रविवारी लोक चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जात असताना झाला आहे. हा हल्ला रशिया आणि युक्रेनच्या युद्धाचा टर्निंग पॉईट ठरु शकतो असे म्हटले जात आहे. या हल्ल्यानंतर बचाव मोहिम सुरु झालेली आहे. घटनास्थळावर संबंधित यंत्रणांचे अधिकारी पोहचले असून मदत कार्य वेगाने सुरु आहे.
यूक्रेनच्या वतीने जगभरातील देशांना आवाहन करण्यात आले आहे की, जगाला दृढतेने प्रतिकार करायला हवा. अमेरिका, युरोप आणि जगातील प्रत्येक जण युद्ध आणि हत्या यांना संपवण्याची प्रत्येकाची इच्छा आहे. रशियाला मात्र याच प्रकारचा दहशतवाद पाहीजे आणि तो युद्धात खेचत आहे. रशियावर दबाव आणल्याशिवाय शांतता प्रस्थापित होणे कठीण दिसत आहे. राजकीय चर्चा बॅलिस्टीक मिसाईल आणि हवाई बॉम्बना रोखू शकत नाही. रशियावरील दबावाशिवाय शांतता अशक्य आहे. रशियाच्या विरोधात भूमिका घेणारा हवा आहे, अशी प्रतिक्रीया युक्रेनने व्यक्त केली आहे.