जागतिक बाजारात रशिया करणार डिझेल पुरवठा

वॉशिंग्टन : जागतिकस्तरावर निर्माण झालेली इंधन कोंडी फोडण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी झालेल्या यशस्वी चर्चेनंतर मोठ्या इंधन कराराची अधिकृत घोषणा केली आहे. या करारानुसार, अमेरिका आणि जागतिक बाजारपेठांमधील इंधनाची टंचाई दूर करण्यासाठी रशिया तातडीने लाखो टन डिझेलचा पुरवठा करणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून जागतिक पातळीवर वाढणा-या महागाईशी लढणा-या सर्वसामान्य नागरिकांसाठी हा करार अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

या कराराचा भारतालाही मोठा फायदा संभवतो. कारण, रशियाकडून तेल खरेदीचा मुद्दा ट्रम्प यांनी मांडून भारताला सातत्याने लक्ष्य केले आहे. ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना या ऐतिहासिक निर्णयाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, पुतीन यांच्याशी सकारात्मक आणि फलदायी चर्चा झाली. त्यानुसार अमेरिका तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी रशिया तातडीने तीन लाख टनांपेक्षा जास्त डिझेल इंधनाची खेप रवाना करेल. इतकेच नव्हे, तर येत्या काही महिन्यांत रशियन रिफायनरीजच्या क्षमतेनुसार हा पुरवठा उत्तरोत्तर ४८ लाख टनांपर्यंत वाढवण्यात येणार आहे.

ट्रम्प यांचा ‘यू टर्न’
रशियाकडून तेल खरेदी करणा-या भारतासह विविध देशांना गेल्या काही दिवसांपासून ट्रम्प हे १०० टक्के आयात शुल्क लागू करण्याची धमकी वारंवार देत आले आहेत. तथापि, आता त्यांनीच रशियाकडून तेल खरेदी करण्याची घोषणा केली आहे. त्यांचा हा यू टर्न आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासकांना बुचकळ्यात टाकणारा ठरला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Police Action mod| गंजगोलाईत वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पोलिसांचा रूट मार्च
05:39
Video thumbnail
Latur Hockey News : राज्यस्तरीय स्पर्धेस पात्र मुलींच्या हॉकी संघाला ‘माझं लातूर’चे पाठबळ
02:03
Video thumbnail
Latur Bus Stand : बसस्थानकातील सुरक्षेवरून महिला शिवसैनिक आक्रमक; पोलीस नियुक्तीची मागणी
01:39
Video thumbnail
Latur News : लातुरात गोवा बनावटीच्या दारूचा पर्दाफाश; 19 लाखांचा मुद्देमाल जप्त
03:38
Video thumbnail
Latur Cyber Crime : डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 28 लाखांची फसवणूक; सहा आरोपी अटकेत
03:28
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये पत्नीच्या खून प्रकरणातील आरोपीची पोलीस कोठडीत आत्महत्या
01:29
Video thumbnail
Manoj Jarange|500 कोटींच्या कथित आरोपांवरून शिंदे-फडणवीसांना जरांगेंनी घेरलं
12:51
Video thumbnail
Latur|गुंजन पाटील यांच्या हृदयस्पर्शी कवितांनी व्हिडीएफ बाजारचा समारोप.
10:05
Video thumbnail
Nanded|नांदेड जिल्हा न्यायालयाला बॉम्बची धमकी; न्यायालय परिसर रिकामा, बीडीडीएस तपासणी सुरू
01:35
Video thumbnail
Bashir Shaikh|बशीर शेखविरोधात पोक्सो अंतर्गत तिसरा गुन्हा दाखल; तपास एसआयटीकडे
02:43
Video thumbnail
Latur Traffic|लातूरच्या शिवाजी महाराज चौकात दीड तास वाहतूक ठप्प;शहरातील मुख्य रस्त्यावर कोंडी
02:24
Video thumbnail
Nanded|लोह्यात बजाज आणि श्रीराम फायनान्स कार्यालयांची तोडफोड; क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक
02:19
Video thumbnail
Latur|लातूरच्या अशोक हॉटेल चौकात झाड कोसळले; ऑटोचे नुकसान, जीवितहानी टळली
02:53
Video thumbnail
Nanded|उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते चंद्रकांत शिंदे कुटुंबाला ५ लाखांची मदत
00:41
Video thumbnail
Tuljapur|राणा जगदीशसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सोनारवाडीत जनहिताचे उपक्रम
02:35

Latest news