21 C
Latur
Wednesday, February 4, 2026
Homeअंतरराष्ट्रीयरशियाची भारताला ‘बंपर ऑफर’

रशियाची भारताला ‘बंपर ऑफर’

घोषणा होताच अमेरिकेत भूकंप ट्रम्प यांच्या स्वप्नांचा चुराडा? भारतासमोर पेच निर्माण

मॉस्को : रशियाने पुन्हा एकदा भारताला कच्च्या तेलाच्या खरेदीमध्ये मोठी सूट देण्याची ऑफर दिली आहे, ज्याच्या माध्यमातून भारतामध्ये सुरू असलेला कच्च्या तेलाचा पुरवठा हा सुरळीत सुरू राहावा असा रशियाचा उद्देश आहे. सध्या मार्केटमध्ये कच्च्या तेलाचा प्रति बॅरेल जो रेट सुरू आहे, त्यापेक्षा प्रत्येक बॅरलवर १० डॉलरपेक्षाही जास्त सूट देण्याची ऑफर रशियाकडून भारताला देण्यात आली आहे. बाजार विश्लेषकांच्या मते रशिया भारताला सध्या परिस्थितीमध्ये प्रति बॅरलवर ११ डॉलर इतकी सूट देऊ शकतो. गेल्या ऑक्टोबर महिन्यात कच्च्या तेलाच्या खरेदीवर भारताला जेवढी सूट मिळत होती, त्या पटीत ही सूट तीन पटीने वाढवण्यात आली आहे.

अमेरिका आणि भारतामध्ये ट्रेड डीलची घोषणा झाली आहे, मात्र अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे वारंवार अशी मागणी करत आहेत, की भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी करू नये, त्याऐवजी त्यांनी व्हेनेझुएलाकडून तेलाची खरेदी करावी, मात्र भारताने याबाबत आधीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे, ज्या देशांवर प्रतिबंध आहे, अशा देशांकडून आम्ही तेलाची खरेदी करणार नाही, अमेरिकेने भारतावर भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो म्हणून २५ टक्के अतिरिक्त टॅरिफ लावला होता, तो टॅरिफ आता या ट्रेड डीलसोबतच हटवण्यात आला आहे. अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावला होता, त्यामुळे या काळात रशिया आणि भारताची जवळीक चांगलीच वाढल्याचे पहायला मिळाले, दरम्यान अमेरिकेनं टॅरिफ हटवण्याची घोषणा करताच आता रशियाने देखील भारतासाठी सर्वात मोठी घोषणा केली आहे, अशा परिस्थितीमध्ये आता भारत काय निर्णय घेणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे?

दरम्यान आता भारतासमोर असा मोठा प्रश्न असणार आहे की, एकीकडे अमेरिकेसोबतची डील फायनल झाली आहे, मात्र डोनाल्ड ट्रम्प वांरवार आग्रह करत आहेत की भारताने रशियाकडून तेलाची खरेदी करू नये, तर व्हेनेझुएलाकडून तेलाची खरेदी करावी, तर दुसरीकडे रशियानं अमेरिकेला शह देण्यासाठी भारताला जबरदस्त ऑफर दिली आहे. भारत हा रशियाचा जुना मित्र आहे, तसेच अमेरिकेनं मध्यंतरी लावलेल्या टॅरिफमुळे भारत आणि रशियाची जवळीक आणखी वाढली होती, रशियानं आपली बाजारपेठ देखील भारतासठी खुली केली होती, त्यामुळे आता भारत काय निर्णय घेणार? हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR