25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रकुर्बानी बोकडाच्या दरांत घट

कुर्बानी बोकडाच्या दरांत घट

बकरी ईदनिमित्त विशेष बाजार

नाशिक : प्रतिनिधी
अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या बकरी ईदनिमित्त बोकडांची मागणी वाढली आहे. राज्यातील अनेक ठिकाणी विशेष बाजार भरवून बाजारात विविध प्रकारची बोकडे विक्रीस दाखल झाली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दरांमध्ये चार ते पाच हजारांनी घट झाली आहे, अशी माहिती विक्रेत्यांकडू
न देण्यात आली.

दरम्यान, सोमवारी (ता. १७) सर्वत्र बकरी ईद साजरी होणार आहे. ईदनिमित्त कुर्बानी करण्याची पारंपरिक प्रथा आहे. त्यामुळे बोकडांची मागणी वाढली आहे. त्यानिमित्त ठिकठिकाणी विविध प्रकारचे बोकड विक्रीस दाखल झाले आहेत. बुधवारच्या बाजारासह जुने नाशिक तसेच वडाळा रोड येथे चार ते पाच दिवसांसाठी विशेष बोकड बाजार भरवण्यात आला आहे.

मुस्लिम बांधवांकडून त्यांच्या आवश्यकतेनुसार बोकडांची खरेदी केली जात आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दरांमध्ये चार ते पाच हजारांनी घट झाली आहे. सामान्य बाजारात १२ ते ३० हजारांपर्यंत बोकड विक्रीस आले आहे. तर राजस्थानी विशेष बोकडदेखील विक्रीस आले आहे. एक ते दीड लाखापर्यंत विक्री होत आहे. बोकडांची आवक कमी असल्याने यंदा त्यांच्या विक्रीची दुकानेही कमी आहेत.

तरीदेखील दर वाढले नसून कमी झाले आहेत. त्यामुळे काहीसे नुकसान सहन करावे लागत आहे. सोजर, राजस्थानी, गावठी, तोतापुरी, पतीरा अशा विविध प्रजातींची बोकडं विक्रीस दाखल झाली आहेत. शनिवार आणि रविवारी बाजार अधिक तेजीत येण्याची शक्यता विक्रेत्यांकडून वर्तविण्यात आली. मालेगाव, धुळे, औरंगाबाद, काळपी, बैराहीत, लखनौ शहर, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश तसेच शहरास लागून असलेल्या ग्रामीण भागातून बोकड विक्रीस येतात.

चा-याच्या मागणीत वाढ
बोकडाच्या मागणीप्रमाणे चा-याची मागणी वाढत असते. विक्रेत्यांसह बोकड खरेदी केलेल्या ग्राहकांना त्यांच्या बोकडासाठी चारा खरेदी आवश्यक होऊन जाते. यंदा तापमानात वाढ झाल्याने चा-याचे उत्पन्न घटले आहे. बाजारात विक्रीस येणा-या चा-याची दरवाढ झाली आहे. तर दुसरीकडे बोकडाच्या दरात घट झाल्याने खरेदी-विक्रीचा ताळमेळ बसत नसल्याने विक्रेत्यांना नुकसान सहन करावे लागत आहे, अशा प्रतिक्रिया विक्रेत्यांकडून देण्यात आल्या.

यंदा बाजारात मंदी
गेल्या वर्षीच्या तुलनेत बोकड बाजारात यंदा मंदी आहे. महागाईमुळे नागरिकांकडे पैसे नसल्याने हवी तशी खरेदी-विक्री होत नाही. ग्राहक अतिशय कमी रकमेत बोकडाची मागणी करत आहते. पारंपरिक व्यवसाय असल्याने नुकसान सहन करत व्यवसाय करावा लागत आहे, असे बोकड व्यावसायिक म्हणत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR