19.2 C
Latur
Thursday, January 23, 2025
Homeपरभणीसगुणा देसाई, शिवराज हिवरे यांची केंद्रीय महोत्सवासाठी निवड

सगुणा देसाई, शिवराज हिवरे यांची केंद्रीय महोत्सवासाठी निवड

पूर्णा : येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयाचे विद्यार्थी सगुणा मारोतराव देसाई व शिवराज सुभाष हिवरे यांची नाशिक येथे दि. १४ व १५ डिसेंबर रोजी होणा-या केंद्रीय क्रीडा महोत्सवासाठी निवड झाली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक विभागीय केंद्र नांदेड आयोजित क्रीडा महोत्सव नुकताच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या क्रीडा मैदानावर पार पडला.

या क्रीडा स्पर्धेत स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ केंद्राचे विद्यार्थिनी सगुणा मारोतराव देसाई हिने २०० मीटर धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला तर शिवराज सुभाष हिवरे या विद्याथ्यार्ची कबड्डी स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे.

या दोन्हीही विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल महाविद्यालयाचे अध्यक्ष गुलाबराव कदम, प्राचार्य डॉ. रामेश्वर पवार, केंद्र संयोजक प्रा. डॉ. प्रभाकर किर्तनकार, कर्मचारी गिरधारी कदम, यादव कल्लाळीकर, महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR