24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeराष्ट्रीयसंत शिरोमणी आचार्य विद्यासागर महाराज यांनी घेतली समाधी

संत शिरोमणी आचार्य विद्यासागर महाराज यांनी घेतली समाधी

मुंबई : जैन समाजाचे सध्याचे आचार्य विद्यासागर महाराज यांनी देहत्याग करून पूर्ण विधीपूर्वक समाधी घेतली. त्यांच्या समाधी घेण्यामुळे आज संपूर्ण जैन समाज शोकाकुल झाला आहे. रात्री २.३५ वाजता त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

ते आचार्य ज्ञानसागर यांचे शिष्य होते. आचार्य ज्ञानसागर यांनी समाधी घेतल्यावर त्यांनी आचार्यपद मुनी विद्यासागर यांच्याकडे सोपवले. अशा स्थितीत वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी २२ नोव्हेंबर १९७२ रोजी मुनी विद्यासागर आचार्य बनले.

आचार्य विद्यासागर महाराज यांनी यापूर्वीच आपल्या आचार्यपदाचा राजीनामा देऊन आपले आचार्यपद त्यांचे आद्य मुनी शिष्य निर्यापक श्रमण मुनी श्री समयसागर यांच्याकडे सोपवले. ०६ फेब्रुवारीलाच त्यांनी मुनी समयसागर आणि मुनी योगसागर यांना खासगीत बोलावून त्यांच्याकडे जबाबदारी सोपवली होती, असे सांगण्यात येत आहे. समयसागर आणि योगसागर हे दोन मुनी त्यांचे पूर्वाश्रमातील सख्खे भाऊ आहेत.

आचार्य विद्यासागर महाराज यांचा जन्म कर्नाटकातील बेळगाव येथील सदलगा गावात १९४६ मध्ये शरद पौर्णिमेच्या दिवशी १० ऑक्टोबर रोजी झाला. आचार्य विद्यासागर महाराज यांना पूर्वाश्रमातील ३ भाऊ आणि २ बहिणी आहेत. तीन भावांपैकी दोन भाऊ आज भिक्षू आहेत आणि एक भाऊ महावीर प्रसाद हे देखील धार्मिक कार्य करतात. आचार्य विद्यासागर महाराज यांच्या बहिणी स्वर्णा आणि सुवर्णा यांनीही त्यांच्याकडून ब्रह्मचर्याची दीक्षा घेतली. आचार्य विद्यासागर महाराज यांनी आत्तापर्यंत ५०० हून अधिक दीक्षा दिल्या आहेत. अलीकडेच ११ फेब्रुवारीला, आचार्य विद्यासागर महाराज यांचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये विश्वातील देवता म्हणून गौरव करण्यात आला.

आई-वडिलांनीही समाधी घेतली –
आचार्य विद्यासागर महाराज यांच्या आई-वडिलांनीही त्यांच्याकडून दीक्षा घेऊन समाधीमृत्यू प्राप्त केला. आचार्य विद्यासागर महाराज यांना संपूर्ण बुंदेलखंडमध्ये ‘छोटे बाबा’ म्हणून ओळखले जाते. कारण त्यांनी मध्य प्रदेशातील दामोह जिल्ह्यातील कुंडलपूर येथील मंदिरात बडे बाबा आदिनाथ भगवान यांची मूर्ती स्थापन केली होती आणि कुंडलपूरमध्ये अक्षरधामच्या धर्तीवर भव्य मंदिरही बांधले होते.

पंतप्रधान मोदींनीही घेतले होते दर्शन
नोव्हेंबरमध्ये छत्तीसगड निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदींनी आचार्य विद्यासागर महाराज यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले होते. आचार्य विद्यासागर महाराज लोककल्याणासाठी ओळखले जातात. गरिबांपासून तुरुंगातील कैद्यांपर्यंत सर्वांसाठी त्यांनी काम केले. आचार्य विद्यासागर महाराज नेहमी देशासाठी ‘भारत म्हणा, इंडिया नको’ असे म्हणत असत. हिंदी राष्ट्र आणि हिंदी भाषेच्या संवर्धनासाठी ते नेहमीच आघाडीवर होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR