29.7 C
Latur
Thursday, February 6, 2025
Homeराष्ट्रीयसाक्षी मलिक कुस्तीतून निवृत्त

साक्षी मलिक कुस्तीतून निवृत्त

नवी दिल्ली : कुस्ती महासंघाच्या (डब्लूएफआय) अध्यक्षपदी भाजप खासदार बृजभूषण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांच्या निवडीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. साक्षी मलिकने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली आहे. पत्रकार परिषदेत भावूक दिसलेली ज्येष्ठ कुस्तीपटू साक्षी म्हणाली की, महासंघाविरुद्धच्या लढाईला बरीच वर्षे लागली. आज जे अध्यक्ष झाले आहेत, तो व्यक्ती बृजभूषण यांना आपल्या मुलापेक्षाही प्रिय आहे किंवा त्यांचा उजवा हात म्हणू शकता. एकाही महिलेला सहभाग दिला नाही. मी माझी कुस्ती सोडून देतो.

तर विनेश फोगट म्हणाल्या की, आम्ही सर्व प्रकारे प्रयत्न केले आणि नंतर दिल्लीच्या रस्त्यावर बसलो. मुलींना वाचवण्यासाठी आम्ही त्यांचे नाव स्पष्टपने सर्वांना सांगितले होते. आम्हाला तीन-चार महिने थांबायला सांगितले होते पण काहीही झाले नाही. संजय सिंह यांना अध्यक्ष करण्यात आले. त्यांना अध्यक्ष केले म्हणजे खेळातील मुलींना पुन्हा बळी पडावे लागेल. आम्ही जी लढाई लढत होतो त्यात यश मिळू शकले नाही. देशात आम्हाला न्याय कसा मिळेल हे माहीत नाही.

भवितव्य अंधारात
फोगट म्हणाल्या की, आज कुस्तीचे भवितव्य अंधारात आहे हे अतिशय दुःखद आहे. आपले दु:ख कोणाकडे मांडावे हेच कळत नाही. आम्ही प्रशिक्षण घेत आहोत. आम्ही तुम्हाला सांगण्यासाठी आलो आहोत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR