30.2 C
Latur
Saturday, July 6, 2024
Homeमहाराष्ट्रघोरपडींची विक्री; वन विभागाच्या पथकावर जीवघेणा हल्ला

घोरपडींची विक्री; वन विभागाच्या पथकावर जीवघेणा हल्ला

चार घोरपडींसह मारेकरी ताब्यात

अमरावती : अमरावतीच्या वडाळी परिसरात घोरपडींची राजरोस विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान, वडाळी येथील पारधी बेड्यावर विक्रीसाठी काही घोरपडी आणल्या गेल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. ही माहिती मिळताच ही विक्री रोखण्यासाठी गेलेल्या वनविभाग आणि पोलिसांच्या पथकावर येथील समूहाकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला. यात वन विभागाचे दोन वनमजूर जखमी झाले असून पोलिस पथकाने हल्ला परतवून लावत चार घोरपडी जप्त केल्या आहेत. तसेच यातील एका संशयित आरोपीलाही ताब्यात घेण्यात आले आहे. सायंकाळच्या सुमारास ही थरारक घटना घडली असून या प्रकारामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

राज्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान अनेक भागात पावसाळ्याच्या प्रारंभी घोरपडींची छुप्या पद्धतीने विक्री काही समूहाकडून केली जाते. अमरावतीच्या वडाळी येथील पारधी बेड्यावरही विक्रीसाठी घोरपडी आणल्या गेल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. दरम्यान, वन विभागाने तात्काळ पोलिसांच्या मदतीने पारधी बेड्यावर धाड टाकली. त्यामुळे बिथरलेल्या पारधी समूहाने वन विभाग आणि पोलिस विभागाच्या पथकावर हल्ला चढवला. या घटनेत एक वनमजूर जखमी झाला आहे. तर या घटनेतील एका संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. तर इतर काही लोक पळून गेल्याची माहिती आहे. वनविभागाच्या सहायक वनसंरक्षक ज्योती पवार यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे. तर या घटनेचा पुढील तपास सध्या वन विभाग आणि पोलिस करत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR