मुंबई : लॉरेन्स बिष्णोई गँगच्या सलमान खान हत्येच्या कथित प्रकरणात वास्पी मेहमूद खान उर्फ वसीम चिकना आणि गौरव विनोद भाटिया उर्फ संदीप बिश्नोई यांना जामीन मंजूर झाला.
सलमान खानच्या हत्येचा कथित कट व्हॉट्सअॅप ग्रुपवर रचला गेला होता आणि चर्चा केली गेली होती. त्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये कोणतेही ठोस पुरावे नाहीत, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा तपास करताना सलमानच्या हत्येचा कट रचला गेल्याचे समोर आले होते. लॉरेन्स विष्णोई गँगकडून पनवेलच्या फार्महाऊसवर सलमानच्या सत्तेचा कट रचण्यात आला होता.