सोलापूर : 12 जानेवारी 1931 रोजी सोलापुरातील चार हुतात्म्यांना ब्रिटिशाकडून फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे सोलापूरचे चार हुतात्मे हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी, हुतात्मा किसन सारडा, हुतात्मा जगन्नाथ शिंदे व हुतात्मा अब्दुल कुर्बान हुसेन यांचा आज स्मृतिदिन सोलापूरच्या या चार हुतात्मांचा आज .93 व्या स्मृतिदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहरच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष किसन भाऊ जाधव प्रा.श्रीनिवास कोंडी हेमंत चौधरी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान अल्पसंख्यांक राष्ट्रीय सरचिटणीस फारुक मटके जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव अमीर शेख सामाजिक न्याय अध्यक्ष राजू बेळेनवरु वैद्यकीय मदत कक्ष अध्यक्ष बसू कोळी युवक कार्याध्यक्ष तुषार जक्का संजय मोरे तनवीर गुलजार ओबीसी अध्यक्ष अनिल छत्रबंध सोशल मीडिया कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे, दशरथ शेंडगे महिला पदाधिकारी शशिकला कस्पटे ,सायरा शेख चित्रा कदम आदी उपस्थित होते ..