कोल्हापूर : माजी राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी लोकसभेसाठी रणशिंग फुंकले आहे. २००९ मध्ये झालेली जखम अजूनही विसरलेलो नाही, असे सांगत त्यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याचे स्पष्ट संकेत आज कोल्हापुरातून दिले. संभाजीराजे यांनी स्वराज्य संघटना लोकसभा निवडणुकीत मुख्य प्रवाहात असल्याचा दावा केला.
कोल्हापूर, नाशिक की संभाजीनगर?
दरम्यान, कोल्हापूर, नाशिक की संभाजीनगर हा निर्णय सुद्धा वेळ ठरवेल असे सुद्धा त्यांनी सांगितले. त्याचबरोबर चर्चेसाठी सर्वांसाठी दरवाजे खुले असल्याचे ते म्हणाले. जे कोणी जास्त प्रेम देतील तिथे संभाजीराजे उभे राहणार असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे लोकसभेसाठी मैदानात उतरणार असल्याची घोषणा एक प्रकारे संभाजीराजे यांनी केली आहे.