22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeसोलापूरसोनी चॅरिटेबल ट्रस्टच्या टेनिस लिगचे विजेते ठरले संचेती स्ट्रायकर्स

सोनी चॅरिटेबल ट्रस्टच्या टेनिस लिगचे विजेते ठरले संचेती स्ट्रायकर्स

सोलापूर(प्रतिनिधी): स्वर्गिय श्रीनिवासजी बी सोनी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित लॉन टेनिस लीगमध्ये संचेती स्ट्रायकर्स यांनी विजेतेपद पटकावले. ऑफिसर्स ्नलब येथील लॉन टेनिस कोर्टवर झालेल्या या अटीतटीच्या सामन्यात मोठी रंगत आली होती.

देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ब्रिटीश राजवटी विरूध्द लढलेले श्रीनिवासजी सोनी यांनी खडतर प्रवास करीत आपले जीवन व्यतीत केले आणि यशाचे शिखर गाठले होते. त्यांच्या कार्यकर्तुत्वाने ते आजरामर झाले. यार्न किंग, बॅडमिंटनपटू अशी बिरूदावली मिळवणारे रिपन हॉलचे तब्बल 25 वर्ष अविरोध चेअरमन तसेच अनेक संस्थावर पदाधिकारी म्हणून त्यांनी अनेक संस्थांना मानाचे स्थान मिळवून दिले.

त्यांच्या मृत्यू नंतरही ते अजरामर राहिले ते त्यांच्या कर्तुत्वाने म्हणूनच त्यांच्या पश्चात त्यांच्या परिवाराकडून श्रीनिवासजी बी सोनी चॅरिटेबल ट्रस्टची निर्मिती करून अनेक समाजोपयोगी आणि क्रीडाक्षेत्रासाठीचे उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून गेल्या तीन दिवसापासून सोनी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये 112 खेळाडूंचा समावेश होता. मायटी मॅशर्स, संचेती स्ट्रायकर, आर पी वॉरियर्स आणि टेनिस किंग्ज या चार टिम मध्ये ही स्पर्धा झाली त्यामध्ये 84 मॅचेस खेळवण्यात आले. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे नेहमी प्लेअर्सच्या लेव्हल प्रमाणे स्पर्धा होतात परंतु या स्पर्धेत ज्येष्ठ खेळाडूंसाठी लिजेंड, प्लॅटिनम, गोल्ड ,सिल्व्हर, ब्लुमिंगस्टार्स असे गु्रप पाडण्यात आलेले होते. 13 ते 85 या वयोगटातील खेळाडू यामध्ये सहभागी झालेले होते.

या स्पर्धेतील पहिले 50 हजाराचे बक्षिस आणि ट्रॉफी संचेती स्ट्रायकर्स यांनी 198 पॉइर्ंटने मिळवून विजयी ठरले. तर द्वितीय बक्षिस 25 हजार आणि ट्रॉफी टेनिस किंग्ज यांनी मिळवली. तसेच तिसऱ्या स्थानावर मोकाज मायटी मास्टर्स यांनी 10 हजार आणि ट्रॉफी मिळवली आणि 5 हजाराचे चौथे बक्षिस आरपी वॉरियर्स यांनी 181 पॉईंटने मिळवले. ज्यादा गुण मिळवणारे टेनिस किंग्ज या गटातील केदार निलावर आणि अरूण मुटकेरी तसेच महेश बिलुरे आणि प्रसाद देगांवकर या दोन जोड्यांना स्टार पेअर्स असे बक्षिस देण्यात आले. या स्पर्धेतील स्टार कॅप्टन म्हणून मोकाज मायटी मास्टर्सचे सिध्दार्थ गांधी यांना किताब देण्यात आला.

या स्पर्धेतील सर्व विजेत्यांना श्रीमती शिलादेवी सोनी यांच्या हस्ते बक्षिसाचे वितरण करण्यात आले. यावेळी सुहास सोनी, विकास सोनी, अनुराधा गांधी, डॉ.शंतनु गांधी, अजय सोनी, अपर्णा सोनी, आदित्य सोनी, सिध्दार्थ गांधी आणि सोनी परिवाराने विशेष मेहनत घेवून ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडली. यावेळी मोकाज मायटी मास्टर्स टिमचे प्रकाश मोकाशी, कॅप्टन सिध्दार्थ गांधी, संचेती स्ट्रायकर्सचे ओनर अमोल संचेती, कॅप्टन अजित संचेती, टेनिस किंग्जचे ओनर सचिन पांढरे आणि कॅप्टन आदित्य मालू, आरपी वॉरियर्सचे ओनर पानघंटी व राठोड आणि कॅप्टन वामसी देवसानी आदी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR