लातूर(विशेष प्रतिनिधी) : रूग्ण सेवा हीच ईश्वर सेवा याचे वृत हाती घेऊन, समाजाचे आपले देणे लागते लागते या भावनेतून, वसुधंरारत्न राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज, अहमदपुर यांच्या प्रेरणेतून कार्तिक पौर्णिमेनिमित्त मांजरसुबा (जि.बीड) कपिलधार येथे संत शिरोमणी मन्मथ माऊलीच्या संजीवन समाधी सोहळा उत्सावानिमित्त शिवसाई एच.पी.गॅस एजन्सी, अहमदपुर व डॉ. पाटील आयुर्वेदीक पंचकर्म हॉस्पीटल लातूरद्वारे सर्व भक्तांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर व मोफत औषधी वाटप ठेवण्यात आले.
संत श्री शिरोमणी मन्मथ स्वामी कार्तिक सोहळा निमित्त श्री क्षेत्र कपीलधार येथे दर्शनासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश व इतर राज्यातील भक्त पायीदींडी करतात. सर्व भक्त मंडळी पायी वारीमधे ९ ते १० दिवस चालत असतात. पायदींडी मुळे भक्त गणास गुडघेदुखी, मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी हा त्रास प्रकर्षाने जाणवतो. हा भक्तांचा त्रास त्वरित कमी करण्यासाठी डॉ. पाटील आयुर्वेद हॉस्पीटल द्वारासंशोधीत आयुर्वेदीक मर्म थेरपी उपचार करण्यात आले व मोफत औषधोपचार देण्यात आले.
उतरत्या वयानुसार वाताचे आजार वाढु शकतात हे वाढु नये म्हणून नियमित सर्व शरीरास आभ्यंग करणे, आहारातील वातुळ पदार्थाचे सेवन बंद करणे व उतरत्या वयात अल्प आहार घेणे किंवा रात्रीचा आहार बंद करणे हेच उतरत्या वयात निरोगी राहण्याचे सुत्र आहे असा आयुर्वेदीक सल्ला डॉ. आशिष पाटील (आयुर्वेदीक मेडिसीन) यांनी उपस्थित भक्त मंडळींना दिला.
या कार्तिकी पायी दिंडी सोहळ्यात गुडघेदुखी, कंबरदुखी,मान/पाठ-दुखी, सर्दी,ताप,दात-दुखी असे एकूण ७००० पेक्षा जास्त रूग्णांची तपासणी डॉ.आशिष अ.पाटील (आयुर्वेदीक मेडिसीन)पुणे, डॉ. लक्ष्मण अ. बिराजदार ( आयुर्वेदीक मेडिसीन) पुणे, डॉ.सुमीत स. पाटील यांनी रूग्ण तपासणी केली व मोफत औषधोपचार देण्यात आले. सोबत विजयकुमार हत्ते, लिंबराज गंगणे यांचे औषधी वाटप सहकार्य लाभले. या समाजाभिमुख कार्या बद्दल संत शिरोमणी मन्मथ स्वामी पंच कमीटी तर्फे डॉ. आशिष पाटील व सर्व हॉस्पीटल टीमचा सत्कार करण्यात आला.