24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्र२४ पासून संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृति व्याख्यानमाला

२४ पासून संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृति व्याख्यानमाला

विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी विश्वशांती विद्यापीठातर्फे आयोजन

पुणे : एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृति व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासना अंतर्गत शुक्रवार, दि. २४ नोव्हेंबर ते गुरुवार, दि. ३० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत २८वी तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमाला एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या संतश्री ज्ञानेश्वर सभागृह, कोथरूड, पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे.

या व्याख्यानमालेचा उद्घाटन समारंभ शुक्रवार, दि. २४ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी ४.०० वा. होणार आहे. या समारंभासाठी बंगळुरू येथील पब्लिक युनिव्हर्सिटीच्या इंडियन इन्स्टिट्यूूट ऑफ सायन्सचे संचालक प्रा. गोविंदन रंगराजन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच, नालंदा विद्यापीठाचे माजी कुलपती व जगविख्यात शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर हे सन्माननीय पाहुणे असतील.

अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड असतील. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्यकारी अध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड हे उपस्थित असतील. गुरुवार, दि. ३० नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ११.०० वा. व्याख्यानमालेचा समारोप समारंभ होईल. केंद्र सरकारच्या एचआरडी विभागाचे ऑल इंडिया कॉन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनचे उपाध्यक्ष डॉ. अभय जेरे हे प्रमुख पाहुणे असतील. तसेच पद्मभूषण प्रा. डॉ. दीपक धर व हिंदी सल्लागार समितीचे सदस्य प्रा. डॉ. योगेन्द्र मिश्रा हे विशेष अतिथि म्हणून उपस्थित राहतील.

या व्याख्यानमालेसाठी शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, तसेच, साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवरांना निमंत्रित केले असून, मानवी आणि आध्यात्मिक मूल्यांचे या व्याख्यानमालेद्वारे संवर्धन व्हावे, हा या व्याख्यानमालेमागील प्रमुख उद्देश आहे, अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे सल्लागार डॉ. संजय उपाध्ये, कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस, २८ व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृति व्याख्यानमालेचे प्रमुख समन्वयक व प्र. कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, प्रा. मिलिंद पात्रे आणि डॉ. महेश थोरवे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ही व्याख्यानमाला सर्वांसाठी खुली ठेवण्यात आली आहे.
ही व्याख्यानमाला माईर्स एमआयटीचे व्यवस्थापकीय विश्वस्त आणि कार्यकारी अध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR