27 C
Latur
Monday, February 24, 2025
Homeमहाराष्ट्र‘आनंदाचा शिधा’ सोबत साडी देखील मिळणार

‘आनंदाचा शिधा’ सोबत साडी देखील मिळणार

राज्य सरकारची बजेटमध्ये तरतूद शिवजयंतीनिमित्त प्रत्येक कुटुंबाला एक साडी

मुंबई : महाराष्ट्र शासनाने यंदाच्या शिवजयंतीपासून ‘आनंदाचा शिधा’ देताना किराणा जिन्नसासोबत आता साडी देखील देण्याचा निर्णय बजेटमध्ये जाहीर केला होता. त्याची अंमलबजावणी सहा मार्चपासून राज्यातील विविध रेशनिंग दुकानातून होणार आहे. अंत्योदय शिधापत्रिका धारकांना दरवर्षी एक साडी भेट देण्यात येणार आहे. यामुळे गरिबांना सणावाराला गोडधोड करण्यासोबत घरातील महिलांना नवीन साडी परिधान करून सण साजरा करता येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे अंतरिम बजेट सादर केले, त्यात ही घोषणा केली होती.

विविध सणानिमित्त रेशन दुकानातून ‘आनंदाचा शिधा’ देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. अयोध्या येथे राम मंदिरात श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त राज्य सरकारने ‘आनंदाचा शिधा’ अल्पदरात देण्याचे जाहीर केले होते. शिवजयंतीनिमित्त वितरित करण्याचा ‘आनंदाचा शिधा’ सर्व रेशन दुकानात पोहोचला आहे. या रेशन दुकानात आता अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना मोफत साडी देण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या निर्णयानुसार दरवर्षी लाभार्थ्यांना एक साडी देण्यात येणार आहे. यंदा शिवजयंतीच्या निमित्ताने ही साडी मिळणार आहे.

‘आनंदाचा शिधा’ सोबत मोफत साडी वाटप
‘आनंदाचा शिधा’ साखर, तेल, रवा, चना डाळ, मैदा, कच्चे पोहे या सहा शिधा जिन्नसाचा समावेश आहे. अंत्योदय रेशनकार्डधारक कुटुंबांना यंदा साडी देखील मिळणार आहे. नाशिक विभागासाठी सुमारे पाच लाख ८१४३० नग साड्यांचा साठा उपलब्ध झाला असून यात धुळे, नंदुरबार जिल्ह्यासाठी सुमारे एक लाख ८१ हजार ९१५ तर खान्देशासाठी एकूण तीन लाख १६ हजार ८४१ साड्यांचा साठा उपलब्ध झाला आहे. सहा मार्चपासून याचे जिल्ह्यात वाटप होणार आहे असे जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले. नाशिक विभागाला पाच लाख ८१,४३० नग साड्या त्यात धुळे जिल्ह्यासाठी ७५ हजार ७३८ तर नंदुरबार जिल्ह्यासाठी एक लाख सहा हजार १७७ साड्या, जळगाव जिल्ह्यासाठी एक लाख ३४ हजार ९२६, नाशिक जिल्ह्यासाठी ११,७५२ तर नगर जिल्ह्यासाठी ८८ हजार साड्यांचा समावेश आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR