25.1 C
Latur
Thursday, December 26, 2024
Homeमहाराष्ट्रसत्यजित कदम शिंदेसेनेत प्रवेश करणार

सत्यजित कदम शिंदेसेनेत प्रवेश करणार

कोल्हापूर : प्रतिनिधी
‘उत्तर’च्या २०२२ साली झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार सत्यजित ऊर्फ नाना कदम यांनी मंगळवार, ५ नोव्हेंबर रोजी शिंदेसेनेमध्ये प्रवेश केला असून हा भाजपला मोठा धक्का आहे. विधानसभा उमेदवारीच्या राजकारणातूनच कदम यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.

आपल्या सर्व समर्थकांना मंगळवारी पाच वाजता होणा-या महायुतीच्या सभेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहनही कदम यांनी केले आहे. काँग्रेसच्या आमदार जयश्री जाधव यांच्या शिंदेसेनेतील प्रवेशामुळे काँग्रेसला धक्का बसला होता, तर आता कदम यांच्या प्रवेशाने भाजपला धक्का बसणार आहे.

कदम हे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे भाचे आहेत. ते २०१० ते २०२० या कालावधीत दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. महापालिकेत त्यांना मानणारे काही नगरसेवक असून याच बळावर त्यांनी २०१४ साली काँग्रेसकडून कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणूक लढवली आणि त्यांना ४७ हजार ३१५ मते मिळाली. भाजपच्या उमेदवारापेक्षा त्यांना ७ हजाराहून अधिक मते होती. अशातच २०१४ साली भाजप-शिवसेना सत्तेवर आल्यानंतर भाजप आणि महाडिक यांच्या ताराराणीच्या वतीने ३० हून अधिक नगरसेवक निवडून आले. त्यांचे नेतृत्व कदम करत होते.

त्यातूनच २०२२ साली झालेल्या ‘उत्तर’च्या पोटनिवडणुकीत भाजपकडून उमेदवारी देण्यात आली; परंतु ७८ हजार मते मिळूनही कदम यांना पराभव स्वीकारावा लागला. आताही ते इच्छुक होते; परंतु खासदार धनंजय महाडिक यांनी त्यांचे चिरंजीव कृष्णराज यांचे नाव पुढे आणल्याने ते नाराज होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR