22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यात स्कूल बसचा भीषण अपघात!

पुण्यात स्कूल बसचा भीषण अपघात!

पुणे : पुण्यामध्ये एका स्कूल बसचा अपघात झाला आहे. वाघोली इथल्या ‘रायझिंग स्टार’ या शाळेची बस झाडाला आदळली आहे. बसमधले काही विद्यार्थी जखमी झाले. खासगी रुग्णालयामध्ये जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. मात्र या अपघातामुळे पुन्हा एकदा स्कूल बसमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या अपघाताचा सीसीटीव्ही व्हीडीओही समोर आला आहे.

ड्रायव्हरचा गाडीवरील ताबा सुटला. सकाळच्या वेळी लोणीकंद पोलिस स्टेशनच्या हद्दीत हा अपघात घडला. या अपघाताचा घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला आहे. अत्यंत वेगाने स्कूल बस येऊन धडकताना दिसते. बसचा दरवाजाकडचा भाग म्हणजेच डावा भाग झाडाला धडकल्यानंतर व्हीडीओमध्ये बसची डॅशबोर्डची काच उडून समोर पडताना दिसते.

बसचा अपघात झाल्यानंतर बसमधील मुलांचा आरडाओरडा आणि किंकाळ्याही ऐकू आल्याची माहिती समोर येत आहे. अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी तातडीने या स्कूल बसमधील मुलांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. काही स्थानिक खिडकीमधून डोकावून रडत असलेल्या मुलांना शांत करण्याचा प्रयत्न करताना ‘शांत व्हा, शांत व्हा. भिऊ नका. काही झालेले नाही, अशा शब्दांत धीर देत होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR