इंदापूर : इंदापूर तालुक्यातील बावडा येथील श्री शिवाजी विद्यालयाच्या शैक्षणिक सहलीसाठी गेलेल्या बसच्या परतीच्या मार्गावर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील वटपळी येथे अपघात झाला असून प्राथमिक माहितीनुसार यामध्ये एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला असून इतर शिक्षक व विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर अकलूज येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बावडा येथील श्री शिवाजी विद्यालयाची शैक्षणिक सहल (ता. १९) रोजी रात्री गणपतीपुळे येथे गेली होती. त्यानंतर आज (गुरुवार, ता. २१ रोजी) सहल पहाटे परतत असताना माळशिरस तालुक्यातील पाटील वस्तीलगत सहलीची एसटी बस (एसटी क्रमांक एमएच १४ बीटी ४७०१) व टेम्पो यांची धडक झाली.
यावेळी बसमध्ये चालक, २ पुरुष व २ महिला असे एकूण ४ शिक्षक व ४० विद्यार्थी होते. या अपघातात एक शिक्षक जागीच ठार झाला तर अन्य शिक्षक व विद्यार्थी जखमी झाले असल्याचे प्राथमिक माहितीनुसार समजत आहे.