कटिहार : सोमवारी रात्री बिहारमधील कटिहारमध्ये लग्नासाठी निघालेल्या व-हाडींची स्कॉर्पिओ रस्त्यावरील उभ्या ट्रॅक्टरला धडकली. या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला. २ जण जखमी झाले आहेत. गाडीत १० जण होते. हे सर्वजण कटिहारच्या कुर्सेला पोलिस स्टेशन हद्दीतील कोष्कीपूरला समेली ब्लॉक ऑफिसजवळ रात्री उशिरा हा अपघात झाला.
मृतांपैकी ६ जण सुपौलचे रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. सुरुवातीला, जखमींवर समेली येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले, परंतु त्यांची प्रकृती गंभीर असल्याने दोघांनाही रेफर करण्यात आले. धिबरा बाजार, बारहारा कोठी, जिल्हा पूर्णिया येथून लग्नाचे व-हाड कोशकीपूरला जात होते. चांदपूर पश्चिम पंचायतीच्या चांदपूर चौकात वाहन अनियंत्रित झाले आणि ट्रॅक्टरला धडकले.
मक्याच्या ढिगा-यावर आदळल्यानंतर तोल गेला
गाडीच्या मागे बाईकवरून येणा-या एका लग्नातील पाहुण्याने सांगितले आम्ही दिब्रा मार्केटहून येत होतो. मला खुडकीपूरला जायचे होते. टिका पट्टी पुलाखाली मक्याचा ढीग ठेवण्यात आला होता. गाडी त्यावरून गेली आणि तोल गेला. पुढे एक ट्रॅक्टर उभा होता, जो मक्याने भरलेला होता. मक्याच्या ढिगा-यावर चढल्यानंतर, स्कॉर्पिओ एका उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला धडकली.