23.2 C
Latur
Saturday, September 21, 2024
Homeराष्ट्रीयकलम ३७० पुन्हा लागू करणार

कलम ३७० पुन्हा लागू करणार

निवडणूक जाहीर होताच आश्वासन

श्रीनगर : जम्मू काश्­मीरमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नॅशनल कॉन्फरन्स पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. जम्मू-काश्­मीरला पूर्ण राज्याचा दर्जा मिळवून देण्याबरोबरच केंद्र सरकारने रद्द केलेले ३७० वे कलम पुन्हा लागू करण्याचे आश्­वासन उमर अब्दुल्ला यांनी या जाहीरनाम्यात दिले आहे.

नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी सोमवार दि. १९ ऑगस्ट रोजी पत्रकार परिषदेत निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्याद्वारे जनतेला १२ आश्­वासने देण्यात आली आहेत. जम्मू काश्­मीरला पूर्ण राज्याचा मिळवून देत २४ वर्षांपूर्वी येथील विधानसभेने स्वायत्तेबाबत मंजूर केलेल्या ठरावाची अंमलबजावणी करण्याचे आश्­वासन देण्यात आले आहे. तसेच, विशेष दर्जा देणारे कलम ३७० देखील पुन्हा लागू करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे अब्दुल्ला यांनी सांगितले. आम्ही फक्त अंमलबजावणी योग्य आश्­वासनेच दिली असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, हा जाहीरनामा म्हणजे आमच्या पक्षाचे व्हीजन डॉक्युमेंट असल्याचेही अब्दुल्ला यांनी यावेळी सांगितले.

जम्मू काश्­मीरला १९५३ पूर्वी जो घटनात्मक दर्जा होता, तो परत मिळावा अशी मागणी करणारा ठराव येथील विधानसभेने २००० साली मंजूर केला होता. त्यावेळी फारुख अब्दुल्ला राज्याचे मुख्यमंत्री होते. तत्कालीन अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने हा ठराव फेटाळून लावला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR