22.6 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeधाराशिवतेरणा पब्लिक स्कुलच्या बास्केटबॉल संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड

तेरणा पब्लिक स्कुलच्या बास्केटबॉल संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड

धाराशिव : प्रतिनिधी
शहरातील तेरणा पब्लिक स्कुलच्या (सीबीएसई) बास्केटबॉल संघाची नांदेड येथे होणा-या विभागीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तेरणा पब्लिक स्कुलचा संघ हा विभागीय स्पर्धेसाठी धाराशिव जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहे. या यशाबद्दल संस्था पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षकांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या शालेय बास्केटबॉल क्रीडा स्पर्धेत सेमी फायनलमध्ये तेरणा पब्लिक स्कूलच्या संघाने धाराशिव शहरातील पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या संघाचा पराभव करुन दणदणीत विजय प्राप्त करून अंतीम फेरीत प्रवेश केला.

अंतीम सामना तेरणा पब्लिक स्कूल विरुद्ध उमरगा येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या संघामध्ये रंगला. या अटीतटीच्या सामन्यात टी. पी. एस संघाने २४-७ अशा फरकाने बाजी मारत विजयाची परंपरा कायम राखली. नांदेड येथे होणा-या विभागीय बास्केट बॉल क्रीडा स्पर्धेसाठी टी.पी.एस शाळेचा संघ धाराशिव जिल्हयाचे नेतृत्व करणार आहे.

या सामन्यामध्ये टी. पी. एस शाळेचे खेळाडू ओंकार कुंभार, अर्जुन गोपने, दुर्गेश कदम, पंकज शिंदे यांनी दमदार खेळी केली. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष पद्माकर फंड, उपाध्यक्ष नितीन भोसले, रत्नदीप वाकुरे, प्राचार्य विलास मोरे यांनी सर्व खेळाडुंचे व मार्गदर्शक प्रशिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR