लातूर : प्रतिनिधी
भारत सरकार, युवा कार्य एवं खेल मंत्रालय व रा.से.यो. क्षेत्रिय निदेशालय, पुणे यांनी राष्ट्रीय एकात्मता शिबीराचे आयोजन एम. एल. आर. इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मलकाजगिरी, हैदराबाद येथे दि. १४ ते २० जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरासाठी येथील दयानंद कला महाविद्यालयातील अधिराज जगदाळे व दीप्ती जाधव यांची निवड करण्यात आली आहे.
सदर शिबिरात देशभरातील सर्व विद्यापीठातील स्वयंसेवक युवक व युवती सहभागी होणार आहेत. या रा.से.यो. शिबिरात सांस्कृतिक कार्यक्रमासोबतच कला, संस्कृती, परंपरा, भाषा, पोशाख या विषयावरील चर्चासत्र होणार आहेत. तसेच याविषयी व्याख्यान, पॅनेल चर्चा करण्यात येणार आहे. त्यांच्या या यशाबद्दल प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड व उपप्राचार्य डॉ. प्रशांत मान्नीकर यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनिलकुमार माळी, डॉ. सुभाष कदम, डॉ. सुनील साळुंके, डॉ. रमेश पारवे, डॉ बालाजी घुटे, डॉ. संदिपान जगदाळे, संजय तिवार, नवनाथ भालेराव हे उपस्थित होते.